Join us  

IPL 2023, MI vs PBKS Live : 'हिटमॅन' रोहित शर्मा ठरला 'सिक्सर किंग'; नोंदवला एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम, परदेशी फलंदाजाना आव्हान

IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : पंजाब किंग्सने अखेरच्या सहा षटकांत केलेली धुलाई पाहून मुंबई इंडियन्सनवर दडपण नक्कीच आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 10:26 PM

Open in App

IPL 2023, Mumbai Indians vs Punjab Kings Live Marathi : पंजाब किंग्सने अखेरच्या सहा षटकांत केलेली धुलाई पाहून मुंबई इंडियन्सनवर दडपण नक्कीच आले आहे. इशान किसन तिसऱ्याच षटकात झेलबाद झाला, परंतु रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि कॅमेरून ग्रीन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करताना MIचा डाव सावरला. रोहितने दमदार फटकेबाजी करताना इतिहास नोंदवला. आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. 6,WD,4,1,4,6,4N,4 ! अरे देवा.... अर्जुन तेंडुलकरला बेक्कार चोपले, रोहित शर्मासह सारे समजवायला आले... 

अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar) एका षटकाने पंजाब किंग्सला डोकं वर काढण्याची संधी मिळाली. चौदाव्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड घेताना PBKS ला ४ बाद ११८ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते, परंतु अर्जुनच्या एका षटकात ३१ धावा चोपल्या अन् MIच्या हातून सामना निसटत गेला. सॅम करन व हरप्रीत भाटीया या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धुतले आणि पंजाबने अखेरच्या ६ षटकांत १०६ धावा कुटल्या. मॅथ्यू शॉर्ट ( ११), प्रभसिमरन सिंग ( २५) व अथर्व तायडे( २९) हे माघारी परतले. 

रोहितने १६वे षटक अर्जुनला दिले. सॅम करन व हरप्रीतने ३१ धावा चोपल्या. त्यानंतर पंजाबच्या गाडीने सुसाट वेग पकडला  करन व भाटीया यांनी ५० चेंडूंत ९२ धावांची भागीदारी केली. हरप्रीत २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांवर बाद झाला. करनने २९ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावा चोपल्या. जितेश शर्मा ७ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला. पंजाबने ८ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, इशान किशनला ( १) अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात माघारी पाठवून MI ला मोठा धक्का दिला. अर्शदीपने आयपीएलमध्ये ५० विकेट्स या बळीसोबत पूर्ण केल्या. 

कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्मा यांनी MIची खिंड लढवताना पॉवर प्लेमध्ये १ बाद ५४ धावा केल्या. या दोघांनी पन्नास धावांची भागीदारीही पूर्ण केली. रोहित शर्माने खेचलेला तिसरा षटकार विक्रमी ठरला. आयपीएलमध्ये २५० षटकार खेचणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज ठरला. आतापर्यंत ख्रिस गेल ( ३५७) व एबी डिव्हिलियर्स ( २५१) यांनी सर्वाधिक षटकार खेचले आहेत. रोहित या विक्रमात तिसऱ्या क्रमांकावर येतो आणि त्यानंतर  महेंद्रसिंग धोनी ( २३५) व विराट कोहली ( २२९) यांचा क्रमांक येतो. १२व्या षटकात लिएम लिव्हिंगस्टनला गोलंदाजीला आणले अन् त्याने रोहितची विकेट मिळवून दिली. रोहित २७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांवर कॉट अँड बोल्ड झाला. ग्रीनसोबत त्याची ७६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्मामुंबई इंडियन्सख्रिस गेलएबी डिव्हिलियर्स
Open in App