IPL 2023, MI vs KKR Live : ९ षटकार व ५ चौकार! अर्जुनच्या पदार्पणाचा गाजावाजा, Venkatesh Iyer ने वाजवला MIचा 'बाजा'; झळकावले शतक

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाचा गाजावाजा असताना वेंकटेश अय्यरने ( Venkatesh Iyer) मुंबई इंडियन्सचा बाजा वाजवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 05:02 PM2023-04-16T17:02:10+5:302023-04-16T17:05:19+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, MI vs KKR Live : After 15 years, Venkatesh Iyer becomes the second batter for Kolkata Knight Riders to score a century | IPL 2023, MI vs KKR Live : ९ षटकार व ५ चौकार! अर्जुनच्या पदार्पणाचा गाजावाजा, Venkatesh Iyer ने वाजवला MIचा 'बाजा'; झळकावले शतक

IPL 2023, MI vs KKR Live : ९ षटकार व ५ चौकार! अर्जुनच्या पदार्पणाचा गाजावाजा, Venkatesh Iyer ने वाजवला MIचा 'बाजा'; झळकावले शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाचा गाजावाजा असताना वेंकटेश अय्यरने ( Venkatesh Iyer) मुंबई इंडियन्सचा बाजा वाजवला. सलामीवीर अपयशी ठरल्यानंतर वेंकटेशने दमदार खेळ केली. पायाला दुखापत होऊनही तो खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभा राहिला आणि त्याला शार्दूल ठाकूरने चांगली साथ दिली. वेंकटेशने शतक झळकावताना MIच्या गोलंदाजांना बदडले. हॅरी ब्रूकनंतर यंदाच्या आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा शतकवीर ठरला. 

वानखेडेवर राडा; KKRचा कर्णधार मुंबईच्या गोलंदाजावर भडकला, सूर्यकुमारने रोखला अन्यथा...


अर्जुनच्या षटकाने मुंबई इंडियन्सनं डावाची सुरूवात केली अन्  त्याने चांगली गोलंदाजी केली. कॅमेरून ग्रीनने दुसऱ्या षटकात KKRला धक्का दिला. एन जगदीसन ( ०) बाद झाला. अर्जुनच्या दुसऱ्या षटकात १३ धावा आल्या. सहाव्या षटकात गोलंदाजीत बदल करताना पीयुष चावला आला अन् त्याने KKRचा सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाज ( ८) याला झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार नितीश राणा फलंदाजीला आला अन् हृतिक शोकीनच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात ५ धावांवर झेलबाद झाला. पण, माघारी जाताजाता त्याच्यात आणि शोकीनमध्ये वाद झाला. पुढच्याच चेंडूवर इशान किशनने शार्दूल ठाकूरला स्टम्पिंग करण्याची संधी गमावली. ( वेंकटेश अय्यरला झाली दुखापत, तरीही खेळला पाहा व्हिडीओ


ग्रीनच्या गोलंदाजीवर दुखापतग्रस्त होऊनही वेंकटेश अय्यर मैदानावर उभा राहिला आणि त्याने २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वेंकटेशने ८२ धावांचा टप्पा ओलांडून MIविरुद्ध KKRच्या फलंदाजाची सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद केली. २०१७मध्ये मनीष पांडेने नाबाद ८१ धावा केल्या होत्या. शार्दूल आणि वेंकटेश यांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि शोकीनने १३ धावांवर खेळत असलेल्या शार्दूलची विकेट घेतली. शोकीनने ३४ धावांत २ विकेट्स घेतल्या. २००८मध्ये ब्रेंडन मॅक्यूलमने KKRकडून शतक झळकावले होते आणि त्यानंतर वेंकटेश अय्यरने तिहेरी धावा केल्या.   वेंकटनेशने ९ षटकार व ५ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूंत शतक झळकावले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, MI vs KKR Live : After 15 years, Venkatesh Iyer becomes the second batter for Kolkata Knight Riders to score a century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.