Join us

IPL 2023 Points Table : लखनौ सुपर जायंट्सला 'डबल' लॉटरी लागली; सनरायझर्स हैदराबादला नमवून तालिकेत घडवले बरेच बदल

IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये नव्या संघांचे पुन्हा एकदा वर्चस्व पाहायला मिळतंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 23:19 IST

Open in App

IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये नव्या संघांचे पुन्हा एकदा वर्चस्व पाहायला मिळतंय. लखनौ सुपर जायंट्सने घरच्या मैदानावर शुक्रवारी दुसऱ्या विजयाची नोंद केली. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली LSG ने उल्लेखनीय कामगिरी करताना सनरायझर्स हैदराबादवर ५ विकेट्स व २४ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सला 'डबल' लॉटरी लागली आणि त्यांनी तालिकेत बरेच उलटफेर केले.

LSG च्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. कृणाल पांड्याने १८ धावांत ३ विकेट्स, तर अमित मिश्राने २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोईने ४-०-१६-१ अशी स्पेल टाकली. SRH कडून अनमोलप्रीत सिंग ( ३१) चांगला खेळला राहुल त्रिपाठी ( ३४), वॉशिंग्टन सुंदर ( १६) आणि अब्दुल समद (२१*) यांनी चांगली खेळी केली. प्रत्युत्तरात लोकेश राहुल व कायले  मायर्स ( १३) यांनी ३५ धावांची भागीदारी केली. दीपक हुडा लगेच माघारी परतला, परंतु कृणालने फलंदाजीत सुरेख फटके मारताना LSG वरील दडपण कमी केले. कृणाल ( ३४) व लोकेशने ३५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली  ३४ ( २३ चेंडू) धावांवर बाद केले. राहुलने ३१ चेंडूंत ३५ धावा केल्या.   

या विजयासोबत लखनौ सुपर जायंट्सने गुणतालिकेत गुजरात टायटन्सना मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. शिवाय त्यांनी फेअर प्ले अवॉर्डमध्येही अव्वल स्थान पटकावले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्स
Open in App