IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : लखनौ सुपर जायंट्सने संथ खेळपट्टीवर सनरायझर्स हैदराबादच्या धावा आटवल्या. कृणाल पांड्या, रवी बिश्नोई आणि अमित मिश्रा या फिरकीपटूंनी SRHच्या फलंदाजांना नाचवले. कृणालची हॅटट्रिक हुकली, परंतु त्याने दिलेल्या ३ धक्क्यांपासून हैदराबादला सावरणे अवघड झाले. राहुल त्रिपाठीने संयमी खेळ करून LSG समोर तगडे आव्हान ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु आजचा दिवस गोलंदाजांचा होता.
इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज विजयी लय मिळवण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद प्रयत्नशील आहेत. SRH ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मयांक अग्रवाल आणि अनमोलप्रीत सिंग यांनी SRHच्या डावाची सुरुवाती केली, परंतु तिसऱ्याच षटकात कृणाल पांड्याने धक्का दिला. मयांक ८ धावांवर मार्कस स्टॉयनिसच्या हाती झेल देऊन परतला. पांड्याने सलग दोन चेंडूवर दोन धक्के दिले. ८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने अनमोलप्रीतला ( ३१) पायचीत पकडले, तर पुढील चेंडूवर कर्णधार मार्करामची दांडी गुल केली. हॅरी ब्रुककडून SRHला संयमी खेळ करून धावा वाढवण्याची अपेक्षा होती, परंतु त्याला घाई नडली. रवी बिश्नोईच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात ब्रुक पहिल्याच चेंडूवर यष्टीचीत झाला. ( कृणाल पांड्याने घेतलेल्या विकेट्सचा व्हिडीओ क्लिक करा )
२० व्या षटकात SRHच्या डावातील पहिला षटकार आला. अब्दुल समदने त्या षटकात दोन षटकार खेचून हैदराबादची धावसंख्ये ८ बाद १२१ धावांपर्यंत पोहोचवली. समदने १० चेंडूंत नाबाद २१ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"