Join us

IPL 2023, LSG vs SRH Live : निराश बसलेली काव्या मारन अचानक सेलिब्रेशन करू लागली, नाचली...! नेमकं काय घडलं?, Video

IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२३ मधील दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत फार कमाल करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 22:01 IST

Open in App

IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२३ मधील दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत फार कमाल करता आली नाही. लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी चोख कामगिरी करताना SRHला १२१ धावाच करू दिल्या. त्यामुळे हैदराबादची मालकीण काव्या मारन ( Kavya Maran) रडकुंडीला आली होती. त्यानंतर LSG च्या ओपनर लोकेश राहुल व कायले मायर्स यांनी दमदार सुरूवात करून दिल्याने काव्याच्या चेहऱ्यावरील हसू हरवले होते. पण, अचानक काहीतरी घडले अन् ती स्टँडवर सेलिब्रेशन करू लागली, नाचली... 

SRH ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि LSG च्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. कृणाल पांड्याने सलग दोन चेंडूवर दोन धक्के दिले. अनमोलप्रीत सिंग ( ३१) चांगला खेळत होता, परंतु कृणालने त्याचीही विकेट घेतली. हॅरी ब्रुककडून अपेक्षा होत्या, परंतु तो गोल्डन डकवर परतला. लखनौने ४० वर्षीय अमित मिश्राला आज त्यांच्याकडून पदार्पणाची संधी दिली. कृणाल व रवी यांच्या वळणाऱ्या चेंडूनंतर अमित मिश्राने  सनरायझर्सची डोकेदुखी वाढवली. रवी बिश्नोईने ४-०-१६-१ अशी स्पेल टाकली. कृणालने १८ धावांत ३ विकेट्स, तर मिश्राने २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. राहुल त्रिपाठी ( ३४), वॉशिंग्टन सुंदर ( १६) आणि अब्दुल समद (२१*) यांनी चांगली खेळी केली.

लोकेश राहुल व कायले मायर्स यांनी लखनौला अपेक्षित सुरुवात करून देताना भुवीच्या पहिल्याच षटकात १४ धावा चोपल्या. मायर्स केवळ ताकदचाच नव्हे तर चतुराईने गॅप काढून चौकार मिळवताना दिसला. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या फझहक फारूकीने SRHला पहिले यश मिळवून देताना मायर्सला १३ धावांवर बाद केले. लोकेशसह त्याची ३५ धावांची भागीदारी संपुष्टात येताच SRHची मालकिण काव्या मारन आनंदाने नाचू लागली. त्यानंतर भुवीनेही स्वतःच्याच गोलंदाजीवर दीपक हुडाचा अप्रतिम झेल टिपला. LSGच्या ६ षटकांत २ बाद ४२ धावा झाल्या. 

 

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्स
Open in App