IPL 2023, Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore Live Marathi : लोकेश राहुलचे दुखापतग्रस्त होणे आज लखनौ सुपर जायंट्सला महागात पडले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या १२६ धावांचा टप्पाही यजमान LSG ला गाठता आला नाही. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील हा सामना पाहून चाहते निराश झाले. फिरकीला पोषक खेळपट्टीवर एका मोठ्या भागीदारीची LSGला गरज होती, परंतु तेच RCB ने होऊ दिले नाही. त्यांनी फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडल्या आणि गुणतालिकेत १० गुण निश्चित केले. KL Rahul ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
१५ पैकी ४ अनफिट; WTC Final पूर्वी भारताची वाढली डोकेदुखी, IPL खेळताना झालेत जखमी
मोहम्मद सिराजने पहिल्या षटकात कायले मायर्सला माघारी पाठवले. सलामीला आलेल्या आयुष बदोनीने कृणाल पांड्यासह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ग्लेन मॅक्सवेलने ही जोडी तोडताना कृणालची ( १४) विकेट मिळवून दिली. जोश हेझलवूडला पुढच्या षटकात पुन्हा गोलंदाजीवर आणले अन् बदोनीने ( ४) चांगला फटका मारलेला, परंतु विराटने तितकाच अप्रतिम झेल घेतला. स्टेडियमवर बसलेली अनुष्का जल्लोष करताना दिसली. वनिंदू हसरंगाच्या षटकात दिनेश कार्तिकने चपळाईने दीपक हुडाला ( १) स्टम्पिंग केले. LSG ने पॉवर प्लेमध्ये ४ विकेट्स गमावल्या आणि LSGवरील दडपण वाढत गेले.
तत्पूर्वी, लोकेश राहुलला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. विराट आणि फॅफ यांनी ६१ धावांची भागीदारी करूनही RCBला ९ बाद १२६ धावांपर्यंतच पोहोचता आले. रवी बिश्नोईच्या गुगलीवर विराट ( ३१) यष्टीचीत झाला. अनूज रावत ( ९), ग्लेन मॅक्सवेल ( ४) आणि सूयश प्रभूदेसाई ( ६) हे अपयशी ठरले. अमित मिश्राने ४० धावांवर फॅफला बाद केले. कृणालने ( ४-०-२१-०), रवी बिश्नोईने ( ४-०-२१-२) व अमित मिश्राने ( ३-०-२१-२) अशी स्पेल टाकली. दिनेश कार्तिक ( १६) रन आऊट झाला. शेवटच्या षटकात नवीन उल हकने सलग दोन धक्के दिले. नवीन उल हकने ३० धावांत ३ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"