Join us  

IPL 2023, LSG vs MI Live : कृणाल पांड्याने Mumbai Indians ला उल्लू बनवलं? त्याच्या डावाने दिला घाव! 

IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : लखनौ सुपर जायंट्सचे ३ फलंदाज ३५ धावांवर माघारी पाठवून मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड घेतली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 9:39 PM

Open in App

IPL 2023, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : लखनौ सुपर जायंट्सचे ३ फलंदाज ३५ धावांवर माघारी पाठवून मुंबई इंडियन्सने सामन्यावर पकड घेतली. पण, मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पांड्या यांनी सुरुवातीला सावध अन् नंतर आक्रमक फटकेबाजी करून LSGला फ्रंटसीटवर आणून बसवले. त्यात १४व्या षटकानंतर कर्णधार कृणालने MI ला उल्लू बनवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. कारण, त्याने टाकलेल्या डावाने मुंबईला मोठा घाव बसला अन् LSG ने १७७ धावांचा डोंगर उभा केला. असं नेमकं काय घडलं? 

MIने  नाणेफेक जिंकून LSGविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दीपक हुडा ( ५), क्विंट न डी कॉक ( १६) आणि प्रेरक मंडक ( ०) यांना माघारी पाठवून MI ने चांगली सुरुवात केली. पण, स्टॉयनिस व कृणाल या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी केली. १४व्या षटकानंतर कृणाल रिटायर्ट हर्ट झाला... त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. पांड्याने ४२ चेंडूंत ४९ धावा केल्या आणि माघारी परतला. 

आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या  

मृत्यूने कवटाळण्यापूर्वी, मला...: MS Dhoni ने साईन केलेली जर्सी दाखवताना सुनील गावस्कर भावूक

मुंबई इंडियन्सचा पियूष चावला 'लेका'साठी हिरो ठरला, पाहा काय किस्सा घडला 

पियूष चावलावर अम्पायर भडकले; Live मॅचमध्ये खडसावले अन् रोहित...

 

अखेरच्या षटकात निकोलस पूरन व स्टॉयनिस यांनी धावसंख्या वाढवावी यासाठी पांड्याने हा डाव खेळला अन् त्याचा LSGला फायदाच झाला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या १८व्या षटकात स्टॉयनिसने ६,०,४,४,६,४ अशा धावा चोपल्या आणि २४ धावांसह हे या मॅचमधील महागडे षटक ठरले. या दोघांनी २४ चेंडूंत ६० धावा जोडल्या. लखनौने २० षटकांत ३ बाद १७७ धावा केल्या. स्टॉयनिस ४७ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह ८९  धावांवर नाबाद राहिला.

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सक्रुणाल पांड्यामुंबई इंडियन्स
Open in App