IPL 2023, Kohli vs Ganguly: विराट कोहलीनं आधी रागाने पाहिले; नंतर सौरव गांगुलीला हात न मिळवताच निघुन गेला पुढे; Video Viral

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२३ मधील दुसऱ्या विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 08:08 PM2023-04-15T20:08:09+5:302023-04-15T20:08:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, Kohli vs Ganguly , RCB vs DC Live : Virat Kohli stares at Sourav Ganguly, Virat kohli Ignore Ganguly not even handshake, Video Goes Viral  | IPL 2023, Kohli vs Ganguly: विराट कोहलीनं आधी रागाने पाहिले; नंतर सौरव गांगुलीला हात न मिळवताच निघुन गेला पुढे; Video Viral

IPL 2023, Kohli vs Ganguly: विराट कोहलीनं आधी रागाने पाहिले; नंतर सौरव गांगुलीला हात न मिळवताच निघुन गेला पुढे; Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२३ मधील दुसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सवर त्यांनी एकतर्फी विजय मिळवला. RCBच्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC ने ३ फलंदाज अवघ्या २ धावांवर गमावले. त्यानंतर त्यांना २० षटकांत ९ बाद १५१ धावाच करता आल्या. पण, या सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू व सपोर्ट स्टाफ जेव्हा एकमेकांना हात मिळवत होते, तेव्हा विराट कोहली व सौरव गांगुली ( Virat Kohli vs Sourav Ganguly) यांनी एकमेकांना हात मिळवणे टाळले. त्याआधी डग आऊटमध्ये बसलेल्या 'दादा'कडे विराट तिरप्या नजरेने पाहत असल्याचा फोटोही व्हायरल झाला आहे.

रिप्लेसमेंट म्हणून आला, पहिलाच सामना गाजवला! विजय कुमार वैशाख ठरणार भविष्यातील सुपरस्टार!

विराट कोहली ( ५०) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( २२) यांनी ४३ धावांची भागीदारी करताना चांगली सुरूवात करून दिली. महिपाल लोम्रोर ( २६) आणि विराट यांनी ३३ चेंडूंत ४७ धावा जोडल्या. हर्षल पटेलला पाचव्या क्रमांकावर पाठवले गेले, पण त्याचा उपयोग झाला नाही. कुलदीप यादवने सलग दोन चेंडूंवर ग्लेन मॅक्सवेल ( २४) व दिनेश कार्तिक यांची विकेट घेतली आणि दिल्लीने टीम हॅटट्रिक साजरी केली. अनुज रावत ( १५) आणि शाहबाज अहमदने ( २०) RCBला सन्मानजनक पल्ला गाठून दिला. RCB ने ५ बाद १७४ धावा केल्या.


प्रत्युतरात, पृथ्वी शॉ ( ०),मिशेच मार्श ( ०) व यश धुल ( १) हे झटपट माघारी परतले. पदार्पणवीर विजयकुमार वैशाखच्या गोलंदाजीवर RCB ला मोठी विकेट मिळाली. वॉर्नर १९ धावांवर बाद झाला. अभिषेक पोरेलही ( ५) लगेच बाद झाला. अक्षर पटेल ( २१) व मनीष पांडे चांगली भागीदारी करताना दिसले, परंतु वैशाखने पुन्हा एक झटका दिला. त्याने कटर बॉल फेकला अन् अक्षर त्यावर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात २१ धावांवर झेलबाद झाला. मनीष ३८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर बाद झाला. वैशाखने आज पदार्पणाचा सामना गाजवताना २० धावांत ३ विकेट्स घेतल्या. अमन खान ( १८) याला बाद करून सिराजने डावातील दुसरी विकेट घेतली. दिल्लीला ९ बाद १५१ धावा करता आल्या.


दरम्यान, या सामन्यातील एक फोटो व व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतोय... यात आधी विराट कोहलीने डगआऊटमध्ये बसलेल्या सौरव गांगुलीला टशन दिली. सामन्यानंतर जेव्हा दोघं समोरासमोर आले, तेव्हा त्यांनी एकमेकांना हात मिळवणे टाळले. दादा BCCIचा अध्यक्ष असताना विराटच्या कर्णधारपदावरून खूप मोठा राडा झाला होता. दोघांमध्ये वादही झाल्याचे वृत्त होते 


 

Web Title: IPL 2023, Kohli vs Ganguly , RCB vs DC Live : Virat Kohli stares at Sourav Ganguly, Virat kohli Ignore Ganguly not even handshake, Video Goes Viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.