IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पंजाब किंग्सने आज कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ( PBKS vs KKR) जी सुरूवात केली होती, ती पाहता २००+ धावा निश्चित वाटत होत्या. पण, कोलकाताच्या गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकांत चांगली कामगिरी करून दाखवली अन् पंजाबच्या धावांना ब्रेक लावला. पंजाबने मोक्याच्या क्षणी विकेट टाकल्याने त्यांना अपेक्षित धावसंख्या उभी करता आली नाही. भानुका राजपक्षाचे अर्धशतक अन् शिखर धवनची संयमी खेळी वगळल्यास पंजाबचे अन्य फलंदाज फार कमाल दाखवू शकले नाहीत.
वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न घेऊन उतरला, उमेश यादवने आज ड्वेन ब्राव्होचा मोठा विक्रम मोडला
कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसिमरन सिंगने १२ चेंडूंत २३ धावा करताना आक्रमक सुरूवात करून दिली. टीम साऊदीच्या षटकात त्याने २ चौकार व १ षटकार खेचला, परंतु किवी गोलंदाजाने चतुराईने विकेट घेतली. भानुका राजपक्षाने KKR च्या गोलंदाजांची धुलाई करताना ३२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५० धावा केल्या आणि धवनसोबत त्याने ५५ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. उमेश यादवने त्याची विकेट घेतली. आयपीएलमध्ये एका प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम उमेश यादवने केला. त्याने पंजाब किंग्सविरुद्ध ३४ विकेट्स घेतल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"