Join us  

IPL 2023, GT vs SRH Live : शुबमन गिलचे खणखणीत शतक; गुजरात टायटन्ससाठी नोंदवला मोठा पराक्रम

IPL 2023, Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Live Marathi : गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादची चांगलीच धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 8:57 PM

Open in App

IPL 2023, Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Live Marathi : गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादची चांगलीच धुलाई केली. पहिल्या षटकात विकेट पडल्यानंतर शुबमन गिलने ( Shubman Gill) सर्व सूत्र हाती घेताना साई सुदर्शनसह १४७ धावांची भागीदारी केली. या दोघांनी SRHला रडकुंडीला आणले होते आणि त्यात क्षेत्ररक्षणात त्यांनी बऱ्याच चूका केल्या. 

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्स तालिकेत १६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि हैदराबाद ८ गुणांसह ९व्या क्रमांकावर आहे. SRHच्या प्ले ऑफच्या आशा संपल्यात जमा आहे आणि काही करिष्मा झाला तरच ते प्ले ऑफ खेळू शकतील. आजच्या सामन्यासह त्यांचे ३ सामने शिल्लक आहेत आणि ते जिंकून जास्तीत जास्त त्यांचे १४ गुण होऊ शकतील. GT ने आज विजय मिळवल्यास क्वालिफायर १ मधील त्यांचे स्थान पक्के होऊन जाईल. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात वृद्धीमान साहाला (० ) स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेला साई सुदर्शन दोन वेळा रन आऊट होता होता वाचला. 

शुबमन गिलचा फॉर्म कामय राहिला आणि त्याने यंदाच्या पर्वात ५००+ धावांचा टप्पा ओलांडला. गिलने GTच्या धावांची सरासरी चढी राखताना पॉवर प्लेमध्ये ६५ धावांपर्यंत संघाला पोहोचवले. साई सुदर्शनसह त्याने अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना SRHच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. गिलने २२ चेंडूंत ९ पुस्तकी चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. त्याचे फटके पाहण्यासारखे होते. ५८ चेंडूंत या जोडीने १०३ धावांची भागीदारी पूर्ण केली. ११व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर GT साठी पहिला षटकार आला. गिलने आज गुजरातकडून खेळताना १००० धावा पूर्ण केल्या आणि हा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्यानंतर हार्दिक पांड्याने ७६८ धावा केल्या आहेत. 

आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या

CSKची संधी ३८ टक्क्यांवर आली; KKRसह १२ गुण असलेल्या ४ संघांत शर्यत लागली

CSK ला हरवणे महागात पडले; KKRचा कर्णधार नितीश राणावर कारवाई

पहिला चेंडू पडताच चेन्नईचा पराभव दिसला...?; MS धोनी नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...!

 

शुबमन व साई यांची ८४ चेंडूंत १४७ धावांची भागीदारी १५व्या षटकात मार्को यान्सेनने तोडली आणि साई ४७ धावांवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्याला ( ८) भुवनेश्वरने बाद केले. नटराजनने पुढील षटकार डेव्हिड मिलरला ( ७) बाद केले. त्यापाठोपाठ फारूकीने ३ धावांवर राहुल तेवातियाला बाद केले. गिलने ५६ चेंडूंत १३ चौकार व १ षटकारांसह आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले. यापूर्वी ९७ धावा ही त्याची सर्वोत्तम भागीदारी होती. 

 

 

टॅग्स :आयपीएल २०२३शुभमन गिलगुजरात टायटन्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App