Join us

IPL 2023, GT vs KKR Live : धडधड वाढवणारा झेल! चेंडू पकडण्यासाठी दोघं धावले, एकमेकांवर आदळले तरीही यशस्वी ठरले, Video

IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live : लक्ष्याचा पाठलाग करताना रहमनुल्लाह गुरबाज आणि नारायणन दगदीसन यांनी चांगली सुरूवात केली. पण,

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 18:02 IST

Open in App

IPL 2023, Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live : हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्ससमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना रहमनुल्लाह गुरबाज आणि नारायणन दगदीसन यांनी चांगली सुरूवात केली. पण, मोहम्मद शमीने GT ला पहिली विकेट मिळवून दिली. 

वृद्धीमान साहा ( १७) आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी चांगली सुरुवात केली. गिल ३९ धावांवर बाद झाला. सुदर्शन व विजय शंकर यांनी दमदार खेळ करताना ३५ धावा जोडल्या. सुदर्शन ३८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर बाद झाला. विजयने नंतर मोर्चा सांभाळताना मिलरसह १६ चेंडूंत नाबाद ५१ धावा जोडल्या. विजय २४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारासह नाबाद ६३ धावा केल्या. कोलकाताने ४ बाद २०४ धावा केल्या. 

गुरबाज चांगल्या फॉर्मात आहे आणि कोलकाता येथे RCB च्या गोलंदाजांची त्याने धुलाई केली होती. आजही तो त्याच प्रयत्नात होता, परंतु शमीच्या अनुभवासमोर तो कमी पडला. शमीने चेंडू जोरात आपटून बाऊन्सर फेकला अन् त्यावर गुरबाजने पुल मारण्याचा प्रयत्न केला. त्याने मारलेला चेंडू जागच्याजागी हवेत उडाला व तो टिपण्यासाठी यष्टिरक्षक वृद्धीमान साहा आणि यश दयाल धावले. दोघंही एकमेकांवर आदळले, परंतु यशने टिपलेला चेंडू खाली पडू दिला नाही.  ( झेल पाहण्यासाठी क्लिक करा

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App