IPL 2023, Gujarat Titans vs Delhi Capitals Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आणखी एक सामना चुरशीचा झाला.. १३१ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनाही मोहम्मद शमीने ( ४-११) धक्के दिले.. अमन खानच्या अर्धशतकाने DC ने ५ बाद २३ वरून सन्मानजनक धावसंख्या उभी केली. हार्दिक पांड्याने एकहाती खिंड लढवताना GTला विजयाच्या उंबरठ्यावर आणले अन् त्यात राहुल तेवातियाने सलग ३ षटकार खेचून DCकडून मॅच खेचून नेली. पण, अनुभवी इशांत शर्माने २०व्या षटकात तेवातियाला बाद केले. इशांतने दिल्लीच्या हातून गेलेली मॅच पुन्हा मिळवून दिली.
श्रेयसचा सोबती अमन खान चमकला; दुर्घटनेमुळे जलदगती गोलंदाजाचा फलंदाज बनला!
मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) भेदक मारा करताना ११ धावांत ४ फलंदाजाला माघारी पाठवून दिल्लीची अवस्था ५ बाद २३ धावा अशी दयनीय केली. अमन खानने अर्धशतक झळकावताना गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अक्षर पटेल व रिपल पटेल यांनीही चांगली फटकेबाजी केली. अक्षर ( २७) व अमन यांनी ५० धावांची भागीदारी केली. अमन शड्डू ठोकून उभा राहिला आणि त्याने ४४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. अमन आणि रिपल पटेल ( २३) यांनी २७ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली आणि संघाला ८ बाद १३० धावा उभारून दिल्या. मोहित शर्माने दोन विकेट्स घेतल्या.
इशांत शर्माने अनुभव पणाला लावताना राहुलला ( २०) माघारी पाठवले. सामना १ चेंडू ७ धावा असा आला. हार्दिक ५९ धावांवर नाबाद होता आणि राशीद खान स्ट्राईकवर होता. इशानने १ धाव देत गुजरातला ६ बाद १२५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. दिल्लीने ५ धावांनी मॅच जिंकली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"