Join us

IPL 2023, GT vs DC Live : W,W,W,W; पॉवर प्लेमध्ये 'हमी' मोहम्मद शमी! १९ निर्धाव चेंडू टाकून घेतल्या ४ विकेट्स

IPL 2023, Gujarat Titans vs Delhi Capitals Live Marathi : मोहम्मद शमीच्या ( Mohammed Shami) भेदक माऱ्यासमोर दिल्ली कॅपिटल्सच्या आघाडीच्या फलंदाजांनी हार पत्करली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 20:12 IST

Open in App

IPL 2023, Gujarat Titans vs Delhi Capitals Live Marathi : मोहम्मद शमीच्या ( Mohammed Shami) भेदक माऱ्यासमोर दिल्ली कॅपिटल्सच्या आघाडीच्या फलंदाजांनी हार पत्करली... गुजरात टायटन्सच्या गोलंदाजाने DCच्या तीन फलंदाजांना पॉवर प्ले मध्येच तंबूची वाट धरायला लावली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर रन आऊट झाल्याने आधीच दिल्लीची अवस्था वाईट झाली होती. शमीने आजच्या सामन्यात ४-०-११-४ अशी अप्रतिम स्पेल टाकली. 

आजही गोंधळ! डेव्हिड वॉर्नर संतापून No Ball असूनही पेव्हेलियनमध्ये गेला; सहकाऱ्यावर भडकला

GT चा संघ १२ गुणांसह सध्या अव्वल स्थानावर आहे आणि त्यांनी विजयाची हॅटट्रिक साजरी केली आहे. दुसरीकडे DCची वाटचाल काही चांगली झालेली नाही आणि ते ८ सामन्यानंतर ४ गुणांसह अजूनही तळावर आहेत. दिल्लीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मिचेल मार्शला आजारपणामुळे आज खेळता येणार नसल्याने दिल्लीला मोठा धक्का बसलाच होता, त्यात मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला बाद केले. DC ने शून्य धावेवर विकेट गमावली. दुसऱ्याच षटकात डेव्हिड वॉर्नरकडून मोठी चूक झाली. प्रियाम गर्गने मारलेल्या चेंडू राशीद खानच्या हातात गेला, परंतु वॉर्नरने धाव घेण्यासाठी क्रिज सोडली. प्रियामने आधी हा बोलून नंतर नकार दिला अन् राशीदीने पळत येत वॉर्नरला रन आऊट केले. दिल्लीला ६ धावांवर दुसरा धक्का बसला. शमीने पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मनीष पांडेला अप्रतिम झेल देण्यास भाग पाडले आणि यष्टिरक्षक वृद्धीमान साहाने तितकाच अफलातून झेल घेतला. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर प्रियाम गर्ग ( १०) शमीच्या स्वींग चेंडूवर चुकला अन् साहाने सोपा झेल घेतला. दिल्लीचा निम्मा संघ २३ धावांवर माघारी परतला.

आयपीएलमध्ये १००+ बळी टिपणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये साहाने नाव नोंदवले. त्याने ७८ झेल व २३ स्टम्पिंग केले आहेत. महेंद्रसिंग धोनीने १७८ ( झेल १३७ व ३६ स्टम्पिंग) आणि दिनेश कार्तिक १६९ ( १३३ झेल व ३६ स्टम्पिंग) हे आघाडीवर आहेत.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३मोहम्मद शामीदिल्ली कॅपिटल्सगुजरात टायटन्स
Open in App