Join us

IPL 2023: चाहत्यांसाठी गुड न्यूज; माहीने सुरू केली IPL 2023ची तयारी, फोटो व्हायरल...

IPL 2023: महेंद्र सिंह धोनीचा नेट्सवर सराव करतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 16:12 IST

Open in App

MS Dhoni Start Practice: भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धोनीने IPL 2023 साठी सराव सुरू केला आहे. बऱ्याच दिवसांपासून मैदानाबाहेर असलेल्या धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो नेटवर सराव करताना दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहता, माहीने आयपीएल 2023 ची तयारी सुरू केली आहे.

भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीने IPL 2023 साठी आधीच तयारी सुरू केली आहे. 2023चे IPL धोनीसाठी अखेरचे असल्याचे मानले जात आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. तो सध्या फक्त आयपीएलमध्येच खेळताना दिसतो. अशातच, त्याचा सरावाचा फोटो पाहून चाहत्यांना धोनीकडून खूप अपेक्षा आहेत.

महिला आयपीएलची तयारी सुरू बहुप्रतिक्षित महिला आयपीएलबाबत सतत चर्चा होत असली तरी, आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआय मार्च 2023 मध्ये महिला आयपीएल आयोजित करण्याची योजना आखत आहे. या स्पर्धेत एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत. 26 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेत T-20 विश्वचषक संपल्यानंतर लगेचच बीसीसीआय महिला आयपीएल आयोजित करण्याचा विचार करत आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनी
Open in App