Join us

IPL 2023 : भारताच्या दिग्गजांनाही 'नाटू नाटू'ची भुरळ; गावस्कर आणि पठाण यांनी धरला ठेका

Naatu Naatu : आयपीएल २०२३ चा रनसंग्राम सुरू झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 12:28 IST

Open in App

Sunil Gavaskar and irfan pathan । नवी दिल्ली : आयपीएल २०२३ चा रनसंग्राम सुरू झाला आहे. आयपीएलच्या १६व्या हंगामातील पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडला. जिथे बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी नृत्य करून आयपीएलच्या सौंदर्यात भर घातली. दरम्यान, IPL च्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात अभिनेत्री तमन्ना भाटिया, रश्मिका मंधाना आणि गायक अरिजीत सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. लक्षणीय बाब म्हणजे कोविड-19 नंतर प्रथमच आयपीएलच्या उद्घाटन समारंभात स्टार्स परफॉर्म करताना दिसले. अशातच भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

पठाणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारताचे दिग्गज सुनिल गावस्कर आणि खुद्द पठाण नाटू नाटू या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, मागील स्क्रीनवर रश्मिका मंधानाचा डान्स दाखवला जात आहे. त्या स्क्रीनच्या समोरच गावस्कर आणि पठाण नृत्य करत आहेत. 

३१ मार्च रोजी झालेल्या आयपीएलच्या १६ व्या हंगामातील उद्घाटनाच्या सामन्यापूर्वी क्रिकेट आणि बॉलिवूडचे अप्रतिम नाते पाहायला मिळाले. सर्वप्रथम सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंगने परफॉर्म करून चाहत्यांचा उत्साह वाढवला. त्यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंधाना यांनी नृत्य करून उद्घाटनाचा दिवस अविस्मरणीय केला. अलीकडेच ऑस्कर अवॉर्ड जिंकणाऱ्या 'नाटू नाटू' या गाण्यावर रश्मिका मंधानासह चाहते थिरकल्याचे पाहायला मिळाले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३सुनील गावसकरइरफान पठाणरश्मिका मंदाना
Open in App