IPL 2023, Orange Cap Drama : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ नवीन नियम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यातला 'इम्पॅक्ट प्लेअर' या नियमाने तर आतापर्यंत काही सामन्यांचे निकालच बदलून टाकले आहेत. कालच मुंबई इंडियन्सने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरवलेल्या टीम डेव्हिडने दिल्ली कॅपिटल्सच्या हातचा विजयाचा घास पळवला. लखनौ सुपर जायंट्स ६ गुणांसह सध्या तालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि त्यापाठोपाठ टॉप तीनमध्ये राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाइट रायडर्स यांचा समावेश आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन आघाडीवर आहे, तर पर्पल कॅपमध्ये लखनौचा मार्क वूड टॉपवर आहे. पण, 'ऑरेंज कॅप' धारकाच्या निवडीचा विषय वादाचा मुद्दा बनू लागला आहे.
हा माणूसच वेगळा आहे! मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर रोहित शर्मा पोहोचला प्रेक्षकांमध्ये अन्... Video
आयपीएल २०२३मध्ये नव्या नियमांप्रमाणे ऑरेंज कॅप धारकाची निवड करण्याच्या प्रक्रियेतही बदल करण्यात यावा अशी मागणी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज टॉम मूडी यांनी केली आहे. 'ऑरेंज कॅप' ही कुणी किती धावा केल्या यावरूनच न ठरवता धावा आणि स्ट्राईक रेट यांचा एकत्रित विचार करून ठरवला गेला पाहिजे. मूडी यांच्या या मागणीला दक्षिण आफ्रिकेचा स्टार एबी डिव्हिलियर्स यानेही पाठींबा दिला आहे.
मुडी यांनी ट्विट केले की, ऑरेंज कॅप ही स्ट्राईक रेटचा विचार करूनच दिली गेली पाहिले. पण, ट्वेंटी-२०त धावा + स्ट्राईक रेट यांचा एकत्रित विचार हा खूप महत्त्वाचा आणि योग्य ठरेल. याने मधल्या फळीतील फलंदाजालाही या शर्यतीत येण्याची संधी मिळेल.
एबीनेही या ट्विटवर रिप्लाय दिला, त्याने लिहिले, मी हे अनेक वर्षांपासून सांगतोय... ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावरील फलंदाजच असतात क्वचितच तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज दिसतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"