IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : कालचा पूर्ण दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर आज इंडियन प्रीमिअर लीगची फायनल पूर्ण पाहायला मिळेल असे वाटले होते. पण, गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी केलेल्या आतषबाजीनंतर वरुण राजाने फटकेबाजी सुरू केली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे आणि आता समीकरणाची मारामारी सुरू झाली आहे.
गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ फायनलमध्ये दमदार कामगिरी केली. साई सुदर्शनच्या ४७ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह ९६ धावांनी मॅच फिरवली. वृद्धीमान साहाच्या ३९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावा आणि शुबमन गिलच्या ३९ धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने ४ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. शुबमन व साहा यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्यानंतर साई सुदर्शनने अविश्वसनीय खेळी केली. साहा आणि सुदर्शन यांनी ४२ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. साहा बाद झाल्यानंतर सुदर्शन 'चक्र' फिरले.
साईने हार्दिक पांड्यासह ३३ चेंडूंत ८१ धावा झोडल्या. हार्दिक १२ चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला. तुषार देशपांडे पुन्हा एकदा महागडा ठरला. त्याच्या चार षटकांत ५६ धावा आल्या. मथिशा पथिरानाने २ विकेट्स घेतल्या, परंतु त्यानेही ४४ धावा दिल्या. दीपक चहर ( १-३८), रवींद्र जडेजा ( १-३८) आणि महिश तीक्षणा ( ०-३६) यांनाही मार बसला. इनिंग्ज ब्रेकमध्ये अर्धा तास मनोरंजनाचा सोहळा झाला अन् त्यानंतर पावसाने बॅटिंग सुरू केली. मुसळधार पावसामुळे आज चेन्नईचे चाहते आनंदाने नाचताना दिसले.. जणू CSKच्या बचावासाठीच वरुण राजा धावले आहेत. ऋतुराज गायकवाडने ३ चेंडूंत ४ धावा करून चांगली सुरुवात करून दिली होती. पण, पावसाच्या हजेरीने CSK चं विजयाचं समीकरण आणखी बिघडवले आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे DLS डकवर्थ लुईस प्रणालीनुसार चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी पुढील समीकरण पार
५ षटकांत - बिनबाद ४३, १ बाद ४९, २ बाद ५६ किंवा ३ बाद ६५
१० षटकांत - बिनबाद ९१, १ बाद ९४, २ बाद ९८, ३ बाद १०२
१२ षटकांत - बिनबाद ११२, १ बाद ११४, २ बाद ११७, ३ बाद १२०
षटकं कमी झाल्यास लक्ष्य किती?
२० षटकं - २१५
१९ षटकं- २०७
१८ षटकं - १९८
१७ षटकं - १९०
१६ षटकं - १८१
१५ षटकं - १७१
१४ षटकं - १६२
१३ षटकं - १५३
१२ षटकं - १४३
११ षटकं- १३३
१० षटकं - १२३
९ षटकं - ११२
८ षटकं - १०१
७ षटकं - ९०
६ षटकं - ७८
५ षटकं - ६६