Join us

IPL 2023, DC vs LSG Live : दिल्ली कॅपिटल्सच्या 'एका' कृतीने सर्वांना इमोशनल केले; असं काय आहे या फोटोत घ्या जाणून

IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रिषभ पंतशिवाय ( Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स प्रथमच खेळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 20:19 IST

Open in App

IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रिषभ पंतशिवाय ( Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स प्रथमच खेळत आहेत. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ मैदानावर उतरला आहे. ३० डिसेंबरला रिषभचा अपघात झाला होता आणि त्यातून तो बरा होतोय. पण, त्याला आयपीएलला मुकावे लागले आहे आणि त्याची उणीव दिल्लीला जाणवतेय. पण, दिल्ली कॅपिटल्सने एक चांगला निर्णय घेतला अन् रिषभची जर्सी डग आऊटवर लटकवली. सध्या सोशल मीडियावर हा फोटो खूपच व्हायरल झाला आहे.   दरम्यान सामन्यात, दिल्लीच्या चेतन सकारियाने चौथ्या षटकात लखनौचा कर्णधार लोकेश राहुल ( ८) याला बाद केले. कायले मायर्सचा सोपा झेल खलिल अहमदने टाकला अन् तोच सध्या महागात पडताना दिसतोय. त्याने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दीपक हुडासह त्याने ९ षटकांत १ बाद ७० धावा फलकावर चढवल्या आहेत. ]

प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी गेल्या आठवड्यात पंतला योग्य ट्रिब्यूट दिली जाईल आणि आयपीएलमध्ये सहभागी होण्याच्या अनोख्या योजनेबद्दल सांगितले होते. "मी आज सकाळी व्यवस्थापकाशी बोललो जेणेकरुन आमच्या डगआऊटमध्ये रिषभ पंतची उणीव जाणवणार नाही, अशी काहीतरी कल्पना आखली. त्याचा नंबर आमच्या प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवर असू शकतो किंवा त्याचा नंबर आमच्या कॅप्सवर असू शकतो. तो दिल्ली कॅपिटल्सचा हृदय आणि आत्मा आहे हे खेळाडूंना समजले पाहिजे, तो दिल्लीचा मुलगा आहे, तो आमचा नेता आहे पण तो आमच्यासोबत नाही," पॉन्टिंग म्हणाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

 

टॅग्स :आयपीएल २०२३रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App