Join us

IPL 2023 : अपघातानंतर प्रथमच रिषभ पंत मैदानावर दिसणार; दिल्ली कॅपिटल्सच्या 'त्या' कृतीवर BCCI मात्र नाराज

IPL 2023, DC vs GT Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा संघ घरच्या मैदानावर म्हणजेच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 16:11 IST

Open in App

IPL 2023, DC vs GT Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा संघ घरच्या मैदानावर म्हणजेच दिल्लीच्या  अरुण जेटली  स्टेडियमवर खेळणार आहे. पहिल्या सामन्यात दिल्लीला पराभव पत्करावा लागला आणि आज ते दुसरा सामना खेळणार आहेत. या सामन्यात रिषभ पंत ( Rishabh Pant) स्टेडियमवर संघाचे मनोबल वाढवण्यासाठी हजर राहणार आहे. रिषभचा गेल्या वर्षी कार अपघात झाला होता आणि त्यामुळे त्याला आयपीएल २०२३ मधून माघार घ्यावी लागली. आता डेव्हिड वॉर्नर दिल्लीचे कर्णधारपद सांभाळत आहे.  

दिल्ली कॅपिटल्स आज गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहेत. या सामन्यात रिषभ पंत स्टेडियमवर उपस्थित राहणआर आहे.  पीटीआयच्या वृत्तानुसार, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने देखील या वृत्ताला दुजोरात दिला आहे.  दिल्ली आणि लखनौ दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात फ्रँचायझीने रिषभची जर्सी डग आऊटवर टांगली होती. प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी संघाचे मनोबल वाढवण्यासाठी रिषभ पंतला स्टेडियममध्ये आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. पीटीआयच्याच वृत्तानुसार आज दिल्ली कॅपिटल्सचे सर्व खेळाडू रिषभच्या १७ क्रमांकाची जर्सी घालून मैदानावर उतरणार आहेत. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने रिषभची जर्सी डग आऊटवर टांगलेली BCCI ला आवडलेली नाही. त्यांनी फ्रँचायझीला तसं न करण्याची ताकीद दिल्याचे वृत्त समोर येतेय.

थोडक्यात वाचला रिषभ... ३० डिसेंबर २०२२ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास रुरकीच्या नरसन सीमेवरील हम्मादपूर झालजवळ रिषभ पंतची कार रेलिंगला धडकली. या अपघातानंतर कारने पेट घेतला आणि या अपघातात पंत गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर त्याला डेहराडूनमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर त्याला विमानाने मुंबईला नेण्यात आले. पंतच्या गुडघा आणि घोट्याच्या अस्थिबंधनाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रिषभ पंतला सध्या पुनरागमन करण्यासाठी बराच वेळ लागेल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सगुजरात टायटन्स
Open in App