Join us

IPL 2023, DC vs CSK Live : डॅनी मॉरिसनने 'खुणवाखुणवी' करून MS Dhoni ला विचारला प्रश्न, जाणून घ्या कारण

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील अखेरचा साखळी सामना दिल्लीत खेळतोय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 15:40 IST

Open in App

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील अखेरचा साखळी सामना दिल्लीत खेळतोय.. महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) ही अखेरची आयपीएल असल्याची चर्चा असल्याने CSK च्या प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांची तौबा गर्दी पाहायला मिळतेय. त्यामुळे मॅच कुठेही असली तरी धोनी चाहते तिथे हजर असतात अन् धोनीनामाचा गजर करतात.. त्याची प्रचिती आज दिल्लीतही आली आणि त्यामुळे टीव्ही रिप्रेझेंटेटर डॅनी मॉरिसन यांनी खुणवाखुणवी करत धोनीला प्रश्न विचारला. नाणेफेक जिंकल्यावर चाहत्यांनी खूपच जल्लोष केला अन् त्यामुळे मॉरिसन यांना धोनीचं काहीच ऐकू येत नव्हतं आणि त्यामुळेच त्यांनी ही खुणवाखुणवी केली. 

दिल्ली कॅपिटल्सने मागच्या सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा धक्का देत त्यांना स्पर्धेबाहेर फेकले. त्यामुळे आज चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्यांच्याकडून घरच्या मैदानावर तसाच धमाका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. CSK ने आज विजय मिळवल्यास प्ले ऑफमधील त्यांचा प्रवेश पक्का होईल आणि आयपीएल इतिहासात सर्वाधिक १२ वेळा प्ले ऑफला जाण्याचा मान CSKचाच असेल. त्यापाठोपाठ मुंबई इंडियन्सने ९ वेळा हा पराक्रम केला आहे.  मग उर्वरित दोन क्रमांकासाठी LSG, MI व RCB यांच्यात शर्यत लागेल.  CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. DC कर्णधार डेव्हिड वॉर्नर याचा कर्णधार म्हणून आजचा १००वा सामना आहे.  

चेन्नई सुपर किंग्स व लखनौ सुपर जायंट्स यांचे प्रत्येकी १५ गुण आहेत. CSK विरुद्ध DC आणि LSG विरुद्ध KKR या लढतीवर अन्य संघांचे गणित अवलंबून असणार आहे. चेन्नईने आज विजय मिळवल्यास ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील आणि गुजरात टायटन्ससह कदाचित क्वालिफार १ खेळतील. 

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App