IPL 2023, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings ) स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेणारा भारताचा पहिला डावखुरा गोलंदाज ठरला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जडेजाने कर्णधार संजू सॅमसनचा त्रिफळा उडवून हा टप्पा गाठला. आजच्या सामन्यात त्याने २१ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. यासह त्याने CSKकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आर अश्विनच्याही विक्रमाशी बरोबरी केली.
अश्विनने २००९ ते २०१५ या कालावधीत चेन्नईकडून खेळताना १२१ सामन्यांत २३.७०च्या सरासरीने १२० विकेट्स घेतल्या होत्या. जडेजाने १६० सामना केळताना २८.१६च्या सरासरीसह आज १२० विकेट्स पूर्ण केल्या. ट्वेंटी-२०त दोनशे विकेट्स घेणारा जडेजा हा भारताचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला. मुंबई इंडियन्सचा जयदेव उनाडकत हा २०० विकेट्स घेणारा भारताचा पहिला डावखुरा जलदगती गोलंदाज आहे.
ट्वेंटी-२०त २००+ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज ( आयपीएल, स्थानिक स्पर्धा, आंतरराष्ट्रीय)
युझवेंद्र चहल - ३०७
आर अश्विन - २९१
पीयुष चावला - २८०
अमित मिश्रा - २७५
भुवनेश्वर कुमार - २५८
जसप्रीत बुमराह - २५६
हरभजन सिंग - २३५
जयदेव उनाडकत - २१०
रवींद्र जडेजा - २००