Join us

IPL 2023, CSK vs RR Live : १२ चेंडूंत ५६ धावा! यशस्वी जैस्वाल कसला खेळला भावा... चेन्नईच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले

जैस्वालने पहिल्याच षटकात आकाश सिंगला ३ आकर्षक चौकार खेचून १४ धावा मिळवल्या. जॉस बटलरनेही त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा कुटल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 20:49 IST

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Marathi : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) आज चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. जैस्वाल व जॉस बटलर या जोडीने राजस्थान रॉयल्सला ८६ धावांची दमदार सलामी दिली. तुषार देशपांडेने चेन्नई सुपर किंग्सला सामन्यात डोकं वर काढून दिले.   

जैस्वालने पहिल्याच षटकात आकाश सिंगला ३ आकर्षक चौकार खेचून १४ धावा मिळवल्या. जॉस बटलरनेही त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा कुटल्या. रवींद्रच्या गोलंदाजीवर जैस्वालने मारलेला उलटा सुपला अप्रतिम होता. त्याने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. जडेजाने CSKला पहिले यश मिळवून देताना बटलरला ( २७) बाद केले. ८६ धावांची भागीदारी नवव्या षटकांत संपुष्टात आली. संजू सॅमसन ( १७) तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याच षटकात देशपांडेने मोठी विकेट घेतली. जैस्वाल ४३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर अजिंक्य रहाणेच्या हाती झेलबाद झाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३राजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App