Join us

IPL 2023, CSK vs RR Live : MS Dhoni ने इतिहास घडविला, IPL मध्ये असा पराक्रम कुणालाच नाही जमला; नाणेफेकीचा कौल CSKने जिंकला

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आमनेसामने आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 19:06 IST

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आमनेसामने आले आहेत. हा सामना चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यासाठी मोठा आहे. आजचा दिवसही धोनीसाठी महत्वाचा आहे. कारण धोनी CSKचा कर्णधार म्हणून २०० वा सामना खेळत आहे. आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाचा कर्णधार म्हणून २००वा सामना खेळणार धोनी पहिलाच खेळाडू आहे. धोनीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा ( १४६) नंबर लागतो.  

चेपॉकची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. सामना जसजसा पुढे जातो, तसतशी फलंदाजी करणे अवघड होते. चेन्नईकडे रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर आणि मोईन अली यांसारखे, तर राजस्थानकडे रविचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल यांसारखे दर्जेदार फिरकीपटू आहेत. प्रत्येकी दोन अर्धशतकी खेळी करणारे राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांची CSKचा बालेकिल्ला असलेल्या चेपॉक मैदानावर त्यांच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध कठोर परीक्षा असेल.  महेंद्रसिंग धोनीने १९९ सामन्यांपैकी १२० सामने जिंकले आहेत, तर ७८ मध्ये हार पत्करावी लागली आहे. महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिचेल सँटनर आणि ड्वेन प्रिटोरियस हे आजच्या सामन्यात खेळणार नाहीत, त्यांच्या जागी मोईन अली आणि महिषा तिक्षाना आज खेळत आहेत. RRच्या संघातही काही बदल आहेत. ट्रेंट बोल्ट आज खेळत नाही. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीराजस्थान रॉयल्स
Open in App