Virat Kohli, IPL 2023 CSK vs RCB: बंगलोर संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचे यंदाचे आयपीएल वैयक्तिक स्तरावर चांगले जात आहे. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात तो आणि त्याच्या संघातील स्टार फलंदाज कुठेतरी कमी पडताना दिसतात. चेन्नई विरूद्धच्या सामन्यात बंगलोरने धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यांना ८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तशातच विराट कोहलीला देखील सामन्यानंतर मोठा दणका बसला.
विराट कोहलीला बसला मोठा झटका!
विराटच्या संघाला धोनीच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. त्याशिवाय, आयपीएलच्या आचारसंहितेच्या कचाट्यातही तो सापडला. त्याच्या वर्तणुकीमुळे त्याचे 10 टक्के मानधन त्याला दंड म्हणून भरावे लागले. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर CSK विरुद्धचा सामना खेळताना विराटला 'आचारसंहितेचे' उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. विराट कोहली आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 च्या लेव्हल 1 मध्ये दोषी आढळला आहे. या अंतर्गत सामनाधिकारींचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. विराट कोहलीने आपला गुन्हा मान्य केल्याने त्याला दंड ठोठवण्यात आला आणि समज देऊन सोडून देण्यात आले.
IPL 2023 RCB vs CSK: धोनीशी रंगल्या गप्पा अन् विराट विसरला पराभवाचं दु:ख... पाहा 'जिगरी' मित्रांचा Video
नक्की काय घडला होता प्रकार?
CSK विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली फलंदाजीत अपयशी ठरला. अवघ्या 6 धावा करून तो सीएसकेच्या आकाश सिंगच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्याआधी चेन्नईच्या बॅटिंगच्या वेळी शिवम दुबे बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केले. ते सेलिब्रेशन मॅच रेफरीला खटकल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. शिवम दुबे पारनेलच्या चेंडूवर सिराजकरवी झेलबाद झाला होता.
आयपीएलचा नियम कलम २.२ म्हणजे काय?
कलम 2.2 हा, सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, ग्राउंडवरील उपकरणे किंवा सहकारी किंवा प्रतिस्पर्ध्याशी गैरव्यवहार या संबंधित आहे. याआधी लखनौ सुपरजायंट्सच्या आवेश खानवरही या कलमाखाली कारवाई करण्यात आली होती. त्याने आरसीबी विरुद्ध विजय मिळल्यावर हेल्मेट जमिनीवर फेकले होते.
नितीश राणा - ऋतिक शोकीनला बसलाय दंड
केकेआरचा कर्णधार नितीश राणा मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. यामुळे त्याला मॅच फी च्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला. राणाला आयपीएल आचारसंहिता 2.21 अंतर्गत 'लेव्हल 1' साठी दोषी ठरवण्यात आले. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या हृतिक शोकीनलाही १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. नितीश राणा सामन्यात आऊट होताच आऊट झाला. दोघांच्यात वाद झाला. त्यामुळे ही कारवाई झाली होती.