Join us

IPL 2023, CSK vs PBKS Live : अजिंक्य तू थांब, त्यांना फलंदाजीला जाऊ दे! MS Dhoniचे दोन मास्टर स्ट्रोक, 'गब्बर' चक्रावला

IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : महेंद्रसिंग धोनी हा यशस्वी कर्णधार का, याची प्रचिती वारंवार आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 16:57 IST

Open in App

IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : महेंद्रसिंग धोनी हा यशस्वी कर्णधार का, याची प्रचिती वारंवार आली आहे. आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे... चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याने ४ जेतेपदं जिंकून दिली आहेत. त्याच्या कल्पक नेतृत्व अन् डावपेचाने अनेक सामने फिरवलेले आहेत... आजही MS Dhoni ने दोन मास्टर स्ट्रोक खेळले अन् ते पाहून पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन चक्रावला.. 

डेव्हॉन कॉनवे चेन्नईत खेळला, फटका पाकिस्तानात बाबर आजमला बसला; मोठा विक्रम तुटला

महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे या  जोडीने PBKS च्या जलदगती गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये सेट होऊ दिले नाही. त्यांनी ६ षटकांत ५७ धावा फलकावर चढवल्या. डेव्हिड कॉनवेने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आणि जगात सर्वात कमी इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडणाऱ्या फलंदाजांत त्याने शॉन मार्शसोबत ( १४४ इनिंग्ज) बरोबरी केली. दहाव्या षटकात सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज यष्टिचीत झाला. त्याने ३१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारांसह ३७ धावा केल्या आणि पहिल्या विकेटसाठी डेव्हॉनसह ८६ धावा जोडल्या.  

राहुल चहर व सिकंदर हे फिरकीपटू गोलंदाजी करत असताना MS Dhoni ने मास्टर स्ट्रोक खेळला... तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी अजिंक्य रहाणे बॅट-पॅडसह तयार होता. पण, धोनीने डावखुऱ्या शिवम दुबेला ( Shivam Dube) पाठवले अन् त्याने हा निर्णय योग्य ठरवला. दोन डावखुरे फलंदाज आता PBSKच्या गोलंदाजांची धुलाई करत होते आणि त्यामुळे शिखर धवनला कागिसो रबाडाला पुन्हा गोलंदाजीला आणावे लागले. डेव्हॉनने यंदाच्या आयपीएलमधील सलग पाचवे अर्धशतक झळकावले आणि शिवमसह २६ चेंडूंत ४४ धावा जोडल्या. डोईजड झालेल्या शिवमला १४व्या षटकात अर्शदीपने माघारी पाठवले. शिवमने १७ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २८ धावा कुटल्या. ७ ते १५ षटकांत सर्वाधिक १६ षटकार खेचण्याचा विक्रम शिवमच्या नावावर नोंदवला गेला. त्याने ग्लेन मॅक्सवेलला ( १३) मागे टाकले. 

शिवमच्या विकेटनंतरही धोनीने डावखुरा मोईन अलीला फलंदाजीला पाठवले आणि चेन्नईने १६ षटकांत २ बाद १५६ धावा केल्या आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्समहेंद्रसिंग धोनीअजिंक्य रहाणे
Open in App