IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : चेन्नई सुपर किंग्सच्या २१७ धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने आक्रमक सुरुवात केली. कायले मायर्स व लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ५.३ षटकांत ७९ धावा कुटल्या. पण, त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने क्षेत्ररक्षणात व गोलंदाजीत बदल केले अन् १२ चेंडूंत ३ विकेट्स मिळवून LSG ला बॅकफूटवर फेकले.
तो आला, त्यानं पाहिलं अन् २ चेंडूत जिंकलं सारं! MS Dhoni चा मोठा विक्रम, चेपॉक दणाणून सोडलं, Video
डेव्हॉन कॉनवे व ऋतुराज गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. ऋतुराजने ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा केल्या. कॉनवेने २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार खेचून ४७ धावा केल्या. शिवम दुबेने २७ धावा आणि मोईन अली १९ धावा करून बाद झाले. बेन स्टोक्स व रवींद्र जडेजा अपयशी ठरले. MS Dhoni मैदानावर येताच चेपॉकवर प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. धोनीनेही सलग दोन षटकार खेचून त्यांना दाद दिली. त्याने ३ चेंडूंत १२ धावा करून आयपीएलमध्ये ५०००+ धावांचा टप्पा ओलांडला. अंबाती रायुडू १४ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला आणि चेन्नईने ७ बाद २१७ धावा केल्या. रवी बिश्नोई व मार्क वूड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"