Join us

IPL 2023 : याला म्हणतात 'भक्ती'! महेंद्रसिंग धोनीसोबत फोटो काढण्यापूर्वी 'तिनं' केलं असं काहीतरी, Video 

IPL 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) क्रेझ अजूनही कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 17:44 IST

Open in App

IPL 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) क्रेझ अजूनही कायम आहे. धोनी हा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून १०० विजय मिळवणारा एकमेव खेळाडू आहे आणि त्याने CSK ला चार जेतेपदं जिंकून दिली आहेत. महेंद्रसिंग धोनीने २३४ आयपीएल सामन्यांत ४९७८ धावा केल्या आहेत आणि १३५ झेल व ३९ स्टम्पिंग केले आहेत. आज इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठ्या संख्येने धोनीचे फॅन्स आलेले पाहायला मिळत आहे. अशात एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

CSK च्या फॅनसाठी वाईट बातमी; महेंद्रसिंग धोनी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये जेतेपदं पटकावली आहेत. मागच्या पर्वात CSK ला ९व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे धोनीने पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. धोनीच्या नेतृत्व कौशल्याबद्दल सारेच भरभरून बोलतात आणि त्याने त्याच्या कर्तृत्वातून ते सिद्धही करून दाखवले आहे. आयसीसीच्या तीन ( ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) ट्रॉफी जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. 

दरम्यान, अहमदाबाद येथे दाखल होण्यापूर्वी चेन्नई विमानतळावर एका महिला फॅनने धोनीसोबत फोटो काढला. धोनीसोबत फोटो काढण्यापूर्वी त्या महिलेने चप्पल बाजूला काढली अन् त्यानंतर ती धोनीच्या बाजूला उभी राहिली. हे पाहून धोनीही इमोशनल झाला.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ - महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, थिक्साना महिषा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, समिरजीत सिंग, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, सुभ्रांषू सेनापती, शैक राशीद, निशांत सिंधू, कायले जेमिन्सन, अजय मंडल, भगत वर्मा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्सऑफ द फिल्ड
Open in App