Join us

मला तुटलेली कार दिली, बाकी खेळाडूंना चांगल्या कार दिल्या; विराटनं सांगितला भन्नाट किस्सा

बाकीच्या सगळ्या खेळाडूंना चांगल्या कार दिल्या, मला मात्र तुटलेली कार दिली; विराटनं सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 17:11 IST

Open in App

मुंबई: आयपीएल २०२२ मध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्सकडून खेळताना दिसेल. कोहलीनं गेल्या हंगामानंतर आरसीबीचं कर्णधारपद सोडलं. त्यामुळे आता कोहली नेतृत्त्व करताना दिसणार नाही. कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आरसीबीकडून खेळत आहे. संघातील भरवशाचा खेळाडू अशी त्याची ओळख आहे. आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर त्यानं संघाला आतापर्यंत अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. स्टार खेळाडू म्हणून नावारुपाला येण्याआधी विराटनं केलेला संघर्ष खूप मोठा आहे.

आता आरसीबीचा एक महत्त्वाचा खेळाडू असलेल्या विराटसाठी एकदा आरसीबीनं तुटलेली कार पाठवली होती. त्याचवेळी संघातल्या इतर खेळाडूंना मात्र चांगल्या कार पाठवण्यात आल्या होत्या. आयपीएलच्या पहिल्या पर्वावेळी हा किस्सा घडला. त्याची आठवण विराट कोहलीनं एका पॉडकास्टमध्ये शेअर केली. त्यावेळी कोहली अंडर १९ संघाचा भाग होता. 

मला एका तुटलेल्या ओम्नी व्हॅनमधून विमानतळावर पाठवण्यात आलं. त्याचवेळी इतर खेळाडूंना मात्र चांगल्या कार देण्यात आल्या होत्या, अशी आठवण कोहलीनं सांगितली. 'मीच शेवटी राहिलो होतो. बाकी सगळे विमानतळावर जाण्यासाठी रवाना झाले होते. याला कोणतीही कार देऊ, असा विचार त्यांनी केला असावा. व्हॅन जुन्या मॉडेलची होती. तिची अवस्था फारच वाईट होती. जिथे पाय ठेवतो तिथला पत्रा झिजला होता. तिथून मला खाली असलेला रस्ता दिसत होता,' असा भन्नाट किस्सा कोहलीनं सांगितला.

कोहलीला पहिल्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तो निराश झाला होता. मात्र २०१६ चा हंगाम अविस्मरणीय ठरला. कोहलीच्या नेतृत्त्वाखाली संघाला आयपीएलचं जेतेपद पटकावण्यात अपयश आलं. 

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली
Open in App