Join us

IPL 2022: हे बीसीसीआयच्या निर्देशांचे उल्लंघन, पंजाब किंग्सची लोकेश राहुलविरोधात तक्रार

IPL 2022: ‘मागच्या दोन सत्रात संपूर्ण मोकळीक दिल्यानंतरही Lokesh Rahul हा Punjab Kings सोडून लखनौ संघाचे कर्णधारपद स्वीकारण्याच्या विचारात आहे. रिटेनशनआधीच त्याने अन्य संघांसोबत संपर्क साधला असेल तर हे BCCIच्या निर्देशांचे उल्लंघन ठरते,’ अशी तक्रार पंजाब संघाने केली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 08:04 IST

Open in App

नवी दिल्ली : ‘मागच्या दोन सत्रात संपूर्ण मोकळीक दिल्यानंतरही लोकेश राहुलपंजाब किंग्स सोडून लखनौ संघाचे कर्णधारपद स्वीकारण्याच्या विचारात आहे. रिटेनशनआधीच त्याने अन्य संघांसोबत संपर्क साधला असेल तर हे बीसीसीआयच्या निर्देशांचे उल्लंघन ठरते,’ अशी तक्रार पंजाब संघाने केली. राहुलकडे २०२०च्या सत्रात अश्विनऐवजी कर्णधारपद सोपविण्यात आले होते.  त्याने फलंदाजीत चांगली कामगिरी तर केली, मात्र संघ प्लेऑफपासून दूर राहिला होता.  आता हाच राहुल लखनौ संघाचे कर्णधारपद मिळविण्याच्या बेतात आहे.  पंजाब किंग्सचे सहमालक नेस कपाडिया म्हणाले, ‘राहुल संघात असावा असे वाटत होते,  मात्र तो लिलावात जाऊ इच्छितो. अन्य संघाने त्याच्यासोबत किंवा त्याने संघासोबत संपर्क केला असेल तर ते चुकीचे आहे.  राहुलने असे केले असेल, तर ते बीसीसीआय नियमांचे उल्लंघन आहे.’

जडेजा झाला होता निलंबित...२०१०मध्ये रवींद्र जडेजाला अशाच प्रकरणात वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते.  त्याने राजस्थान रॉयल्सकडून रिलीज होण्याआधीच अन्य संघांसोबत चर्चा सुरू केली होती.  

अनिल कुंबळे म्हणतात...प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाले, ‘आम्ही राहुलला कायम ठेवू इच्छित होतो. त्याने लिलावात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. तो खेळाडूचा विशेषाधिकार आहे,’ मयांक अग्रवालला पंजाब संघ कर्णधार बनवू शकतो. त्याने २०२० मध्ये ४२० आणि २०२१च्या हंगामात ४४१ धावा केल्या.

टॅग्स :लोकेश राहुलआयपीएल २०२१पंजाब किंग्स
Open in App