मुंबई : ‘अशक्य ते शक्य’ करून दाखविणारा राहुल तेवतिया. ‘डेथ ओव्हर’मध्ये त्याच्या फटक्यांमध्ये आत्मविश्वास झळकतो. चेंडू येण्याची प्रतीक्षा करतो आणि फटका हाणतो. त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट असले तरी संकटसमयी संयम ढळू न देण्याचा मोठा गुण आहे. शारजात २०२० मध्ये शेल्डन कॉटरेलला एका षटकात पाच षटकार मारल्यापासून त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे मत माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
तेवतिया गुजरात टायटन्सला सामने जिंकून देत आहे. या बळावर भारताच्या टी-२० संघात येण्याची त्याची दावेदारीदेखील प्रबळ होताना दिसते. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले, ‘शारजात कॉटरेलला मारलेल्या षटकारांमुळे अशक्य गोष्ट शक्य करू शकतो हे सिद्ध झाले.’