IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) डी वाय पाटील स्टेडियमवर इंडियन प्रीमिअर लीग 2022मधील पहिला विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) बॅकफूटवर फेकले. पहिल्या सामन्यात 200+ धावा करूनही पराभव पत्करावा लागलेल्या RCBची आज विजयासाठी 129 धावांचा पाठलाग करताना चांगली दमछाक झाली. अखेरच्या षटकात दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) बंगळुरूला मॅच जिंकून दिली.
नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यानंतर कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आकाश दीप, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज व डेव्हिड व्हीली यांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवला. वेंकटेश अय्यर ( 10) व अजिंक्य रहाणे ( 9) हे झटपट माघारी परतले. श्रेयस अय्यर ( 13), सुनील नरीन ( 12) व शेल्डन जॅक्सन ( 0) यांना वनिंदू हसरंगाने बाद केले. आकाश दीपने , हर्षलने 2 विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेलने 3 खणखणीत षटकार खेचून KKRच्या फॅन्सना दिलासाही दिला. पण, हर्षल पटेलने त्याची ( 25) विकेट घेतली. हसरंगाने सर्वाधिक 4 विकेट्स टिपल्या. उमेश यादव व वरुण चक्रवर्थी यांनी अखेरची चार षटकं खेळून काढताना कोलकाताला 18.5 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारून दिली. या दोघांनी 27 धावांची भागीदारी केली.
त्यामुळे बंगळुरूच्या फलंदाजांवर दडपण निर्माण झालेले दिसले. 16व्या षटकाला अहमदने धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात वरुण चक्रवर्थीला खणखणीत षटकार खेचला, परंतु पुढच्याच चेंडूवर तो स्टम्पिंग झाला. अहमदने 3 षटकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. बंगळुरूला आता 4 षटकांत 28 धावा करायच्या होत्या आणि मॅच फिनिशर दिनेश कार्तिक मैदानावर आला. टीम साऊदीने 18व्या षटकात रुथरफोर्डला ( 28) माघारी पाठवून RCBच्या अडचणी वाढवल्या. त्याच षटकात वनिंदू हसरंगाही 4 धावा करून रसेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. साऊदीनं 4 षटकांत 20 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. सुनील नरीनने 12 धावांत 1 विकेट घेत कंजूस गोलंदाजी केली.