Join us  

IPL 2022 T20 Match MI vs DC Live : Kuldeep Yadav ने Mumbai Indiansचे कंबरडे मोडले, Tim Seifertने अफलातून कॅच घेत किरॉन पोलार्डला माघारी पाठवले

IPL 2022 T20 Match MI vs DC Live Updates : कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) चा जणू नवा जन्म झाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 5:05 PM

Open in App

IPL 2022 T20 Match MI vs DC Live Updates : कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) चा जणू नवा जन्म झाला... भारतीय संघात असूनही अंतिम ११मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या कुलदीपवर दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) विश्वास दाखवला. रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग आणि किरॉन पोलार्ड या तगड्या खेळाडूंना कुलदीपने बाद केले आणि Mumbai Indians चे कंबरडे मोडले. रोहितच्या विकेटनंतर मुंबई इंडियन्सचा मंदावलेला धावांचा वेग इशान किशन व किरॉन पोलार्ड वाढवतील, असे वाटले होते. पण, कुलदीपच्या फिरकीने पोलार्डला माघारी पाठवले. टीम सेईफर्टने ( Tim Seifert ) इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील अफलातून झेल टिपला.

पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातील सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जात आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या Delhi Capitals ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे . मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात टीम डेव्हिड, टायमल मिल्स तिलक वर्मा यांना पदार्पणाची संधी दिली आहे,  तर दिल्ली कॅपिटल्सकडून टीम सेईफर्टन, रोव्हमन पॉवेल, शार्दूल ठाकूर, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव पदार्पण करत आहेत.

कुलदीपने त्याच्या चार षटकांत १८ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. रोहित ४१ धावांवर माघारी परतला आणि त्याने इशानसह पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या. अनमोलप्रीत ( ८) व पोलार्ड ( ३) झटपट माघारी परतले. पदार्पणवीर तिलक वर्माने सुरेख फटके मारताना २२ धावा केल्या, परंतु खलिल अहमदने त्याला बाद केले. इशानने अर्धशतकी खेळी करून मुंबईला १५०+ धावांचा पल्ला पार करून दिला. 

पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सकिरॉन पोलार्डकुलदीप यादवदिल्ली कॅपिटल्स
Open in App