Join us  

IPL 2022 T20 Match MI vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, Mumbai Indians ने तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली 

IPL 2022 T20 Match MI vs DC Live Updates :  पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातील सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 3:13 PM

Open in App

IPL 2022 T20 Match MI vs DC Live Updates :  पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातील सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जात आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या Delhi Capitals ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे . मुंबईने यंदा कर्णधार रोहित शर्मासह, किरॉन पोलार्ड, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश असलेली कोअर टीम कायम राखली आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात सूर्यकुमार खेळणार नसला, तरी उर्वरित प्रमुख खेळाडू मुंबईला विजयी सुरुवात करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.

दुसरीकडे दिल्लीकडून पृथ्वी शॉ सलामीला खेळवणार आहे. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर अद्याप संघासोबत जुळला नसल्याने, दिल्लीला त्याची कमतरता भासेल.  अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल फिनिशरची भूमिका निभावतील. फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव आणि अक्षर यांच्या खांद्यावर आहे.  

मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात टीम डेव्हिड, टायमल मिल्स तिलक वर्मा यांना पदार्पणाची संधी दिली आहे,  तर दिल्ली कॅपिटल्सकडून टीम सेईफर्टन, रोव्हमन पॉवेल, शार्दूल ठाकूर, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव पदार्पण करत आहेत,   

दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, टीम सेईफर्ट, मनदीप सिंग, रिषभ पंत, रोव्हमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, खलिल अहमद, कमलेश नागरकोटी ( Delhi Capitals: 1 Prithvi Shaw, 2 Tim Seifert, 3 Mandeep Singh, 4 Rishabh Pant (capt, wk), 5 Rovman Powell, 6 Lalit Yadav, 7 Axar Patel, 8 Shardul Thakur, 9 Kuldeep Yadav, 10 Khaleel Ahmed, 11 Kamlesh Nagarkoti)

मुंबई इंडियन्स - इशान किशन, रोहित शर्मा, तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंग, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बसील थम्पी ( Mumbai Indians: 1 Ishan Kishan (wk), 2 Rohit Sharma (capt), 3 Tilak Varma, 4 Anmolpreet Singh, 5 Kieron Pollard, 6 Tim David, 7 Daniel Sams, 8 M Ashwin, 9 Tymal Mills, 10 Jasprit Bumrah 11 Basil Thampi) 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App