IPL 2022 T20 Match LSG vs GT Live : मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) लखनौ सुपर जायंट्सच्या ( Lucknow Super Giants) आघाडीच्या फलंदाजांना माघारी पाठवून गुजरात टायटन्सला ( Gujarat Titans) सामन्यावर पकड मिळवून दिली. पण, दिपक हुडा ( Deepak Hooda) व आयूष बदोनी ( Ayush Badoni) या जोडीने लखनौ सुपर जायंट्सचा डाव सावरला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याला १३९kmph च्या वेगाने गोलंदाजी करताना आनंद झाला, परंतु लखनौच्या सेट झालेल्या जोडीने त्याच्या चार षटकांत ३७ धावा चोपल्या. लखनौने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.
मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेत लखनौची अवस्था ४ बाद २९ अशी केली होती. कर्णधार लोकेश राहुल ( ०) पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉक ( ७), एव्हिन लुईस ( १०) व मनीष पांडे ( ६) हे झटपट माघार परतले. हुडा व बदोनी यांनी लखनौच्या डावाला आकार दिला आणि ६८ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. हुडाने ३६ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याला राशिद खानने LBW केले. हुडा ४१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा करून माघारी परतला. बदोनीने दमदार खेळ सुरू केला, शमीने टाकलेल्या १८व्या षटकात फर्ग्युसनने त्याचा झेल सोडला.
शमीने ४ षटकांत २५ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. शमीने टाकलेल्या १८व्या षटकात बदोनीने १५ धावा कुटल्या. बदोनीने षटकार खेचून पदार्पणातील अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३८ चेंडूंत ही खेळी साकारली. आयपीएल पदार्पणात ६व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन अर्धशतक झळकावणारा बदोनी हा पहिलाच फलंदाज ठरला. ( Ayush Badoni becomes the first player to score 50+ runs on IPL debut, batting at No.6 or below) २०व्या षटकात बदोनी बाद झाला. त्याने ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. राशिद खान व ल्युकी फर्ग्युसन सारख्या अनुभवी गोलंदाजांना त्याने आत्मविश्वासाने षटकार खेचले. LSG ने ६ बाद १५८ धावा केल्या.