IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरूवात झाली. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात IPL 2022 चा सलामीचा सामना होत आहे. महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) CSKच्या कर्णधारपदाची धुरा आता रवींद्र जडेजाच्या खांद्यावर सोपवली आहे, तर KKR श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास लिहिण्यासाठी उत्सुक आहेत. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२००७मध्ये रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघात विराट कोहली खेळला होता आणि आज महेंद्रसिंग धोनी CSKकडून जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. दीपक चहर आणि मोईन अली यांच्या शिवाय CSK ला आजच्या सामन्यात खेळावे लागत आहे. चहर अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही, तर उशीरा व्हिसा मिळाल्याने अली २४ तारखेला मुंबईत दाखल झाला आणि तो आता तीन दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहे. कोलकातालाही पॅट कमिन्स व आरोन फिंच या ऑस्ट्रेलियन खेळाडूंशिवाय खेळावे लागेल. सॅम बिलिंग, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांनी आज KKR कडून पदार्पण केले आहे.
कोलकाता आजच्या सामन्यात सॅम, आंद्रे रसेल व सुनील नरीन या तीन परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरणार आहे. चेन्नईने डेव्हॉन कॉनवे, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने व ड्वेन ब्राव्हो या परदेशी खेळाडूंसह उतरणार आहेत.
CSK Vs KKR Head To Head in the IPL
सामने - २६
चेन्नईने जिंकलेले - १७
कोलकाताने जिंकलेले - ८
अनिर्णीत - १
कोलकाता नाईट राइडर्स: वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नरिन, शेल्डन जॅक्सन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि उमेश यादव
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, तुषार देशपांडे