Join us

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Suresh Raina झाला इमोशनल; म्हणाला, असं वाटतं होतं की पिवळी जर्सी घालून मैदानावर उतरावं

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या लढतीने झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 19:44 IST

Open in App

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या लढतीने झाली. CSK ने पहिल्याच षटकात सलामीवीर ऋतुराज गायकवाड याची विकेटही गमावली. दरम्यान, Mr IPL सुरेश रैना ( Suresh Raina) ही लढत पाहताना भावनिक झाला. आयपीएल २०२२ मध्ये सुरेश रैना खेळाडू म्हणून नव्हे तर समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. जेव्हा तो  स्टेडियमवरून कॉमेंट्री बॉक्समध्ये जात होता तेव्हा त्याच्या मनात खेळत नसल्याची खंत आली आणि त्याने ती बोलून दाखवली.

समालोचन करताना सुरेश रैना म्हणाला, माझ्यासाठी महेंद्रसिंग धोनीच हा कायम कर्णधार असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे चार संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील. पण, कॉमेंट्री बॉक्समध्ये जात असताना स्टेडियमवर चालत असताना वाटत होतं की लगेच जाऊन पिवळी जर्सी घालावी आणि स्टेडियममध्ये प्रवेश करावा.  

रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नव्हती. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत.  

टॅग्स :आयपीएल २०२२सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App