Join us

Natasa Stankovic IPL 2022 SRH vs GT Live Updates : राहुल तेवातिया, राशिद खान यांनी बाजी मारली; हिरमुसलेली नताशा स्टँकोव्हिच बेभान होऊन नाचली, Video 

महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीनंतर आज राहुल तेवातिया व राशिद खान यांची आतषबाजी हिट ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 00:05 IST

Open in App

IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Updates : आयपीएल २०२२मध्ये आज थरारक विजयाचा अनुभव आला.... महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीनंतर आज राहुल तेवातिया व राशिद खान यांची आतषबाजी हिट ठरली. सनरायझर्स हैदराबादने ठेवलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सनची अवस्था १४ षटकांत ५ बाद १४० झाली होती. उम्रान मलिकने ( Umran Malik) २५ धावांत ५ विकेट्स घेत गुजरातला हादरवून टाकले होते, परंतु राहुल तेवातिया व राशिद खान ( Rahul Tewatia and Rashid Khan) यांनी अशक्यप्राय विजय मिळवून दिला. दोघांनी २४ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकात विजयासाठी २३ धावा हव्या असताना या जोडीने २५ धावा कुटल्या. चार षटकार व १ धाव घेत यांनी सामनाच पलटवला. 

अखेरच्या षटकापर्यंत गुजरातच्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच ( Natasa Stancovic ) हिच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. त्यात उम्रान मलिकच्या वेगवान चेंडूने हार्दिकला दुखापतग्रस्तही केले होते. त्याची चिंता वेगळी, परंतु राशिदने अखेरचा चेंडू सीमापार पाठवला अन् नताशा बेभान होऊन नाचली...

पाहा व्हिडीओ... अभिषेक शर्माच्या ४२ चेंडूंत ६ चौकार  व ३ षटकारांसह ६५ धावा आणि एडन मार्कराम ५६ धावांच्या ( २ चौकार व ३ षटकार) जोरावर सनरायझर्स हैदराबादने तगडे आव्हान उभे केले.  शशांक सिंगने ६ चेंडूंत २५ धावांची नाबाद ( ३ षटकार  व १ चौकार) खेळी करून संघाला ६ बाद १९५ धावांचा डोंगर उभा करून दिला. मोहम्मद शमीने ३९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

प्रत्युत्तरात,  शुबमन गिल व वृद्धीमान सहा या जोडीने ९च्या सरासरीने  ६९ धावा जोडल्या. पण,  उम्रान मलिकने ( Umram Malik) सामना फिरवला. त्याने गिल ( २२), हार्दिक पांड्या ( १०), सहा ( ६८), डेव्हिड मिलर ( १७) व अभिनव मनोहर ( ०) यांच्या विकेट्स घेतल्या. मलिकने २५ धावांत ५ विकेट्स  घेतल्या. ५ बाद १४० धावांवरून गुजरातने अशक्यप्राय विजय मिळवला. गुजरातने ५ विकेट्सने हा सामना जिंकला. तेवातिया २१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर, तर राशिद खान ११ चेंडूंत ४ चौकारांसह ३१ धावांवर नाबाद राहिले.   

टॅग्स :आयपीएल २०२२नताशा स्टँकोव्हिचगुजरात टायटन्ससनरायझर्स हैदराबादहार्दिक पांड्या
Open in App