IPL 2022: त्यामुळे डेव्हिड वॉर्नर आयपीएल कर्णधार बनू शकणार नाही, आकाश चोप्रानं सांगितलं धक्कादायक कारण

IPL 2022: जो संघ वॉर्नरवर बोली लावेल, त्यावेळी David Warner त्या संघाचा कर्णधारपदाचा दावेदार मानला जाईल, हे खरे आहे, मात्र  टीम इंडियाचा माजी सलामीवीर Akash Chopraच्या मते वॉर्नर आयपीएल कर्णधार बनू शकणार नाही, असे आकाश चोप्राने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 07:43 AM2022-01-30T07:43:23+5:302022-01-30T07:47:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: So David Warner will not be able to be IPL captain, shocking reason given by Akash Chopra | IPL 2022: त्यामुळे डेव्हिड वॉर्नर आयपीएल कर्णधार बनू शकणार नाही, आकाश चोप्रानं सांगितलं धक्कादायक कारण

IPL 2022: त्यामुळे डेव्हिड वॉर्नर आयपीएल कर्णधार बनू शकणार नाही, आकाश चोप्रानं सांगितलं धक्कादायक कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व दहा संघांनी तयारीला वेग दिला आहे.  यंदा लिलावात जगातील १२१४ खेळाडू उतरले असून या खेळाडूंमध्ये एक नाव ऑस्ट्रेलियाचा सलमाीवीर डेव्हिड वॉर्नरचे देखील आहे,  सनरायजर्स हैदराबादने वॉर्नरला रिलीज केले.  यंदाच्या लिलावात तो सर्वांत महागडा खेळाडू ठरेल, असा अनेकांचा अंदाज आहे.  जो संघ वॉर्नरवर बोली लावेल, त्यावेळी वॉर्नर त्या संघाचा कर्णधारपदाचा दावेदार मानला जाईल, हे खरे आहे, मात्र  टीम इंडियाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राच्या मते वॉर्नर आयपीएल कर्णधार बनू शकणार नाही.

आकाशच्या मते वॉर्नरला सर्वच संघ पसंती दर्शवतील.  मात्र कुठलाही संघ त्याला कर्णधार बनविण्याच्या स्थितीत नसेल.  स्वत:च्या यू ट्यूब चॅनलवर आकाश म्हणाला, ‘आरसीबी वॉर्नरला खरेदी करू शकतो. तरीही त्याला कर्णधार बनविणार नाही. पंजाबचा अपवाद वगळता अन्य दोन संघदेखील नेतृत्वाच्या शोधात आहेत.  वॉर्नर कुठल्यातरी संघात असेल, महागडा खेळाडू बनेल, हे खरे असले तरी तो कुठल्या संघाचे नेतृत्व करेल, असे वाटत नाही. आयपीएल हे लहान कुटुंब आहे. सनरायजर्ससोबत मागच्यावर्षी काय घडले याची सर्वांना जाणीव आहे, कारणे आणि समस्या काय होत्या, याची कल्पना आली असेलच.’

२०२१ च्या पर्वात सनरायजर्सने वाॅर्नरला हटवून केन विलियम्सनकडे नेतृत्व सोपविले होते.  कणर्धारपद काढून घेतल्यानंतर वॉर्नरला अंतिम एकादशमधूनही ड्रॉप केले. वॉर्नर आयपीएल २०१५ ते २०२१ पर्यंत हैदराबादचा कर्णधार राहिला.  त्याच्या नेतृत्वात हैदराबादने २०१६ ला आरसीबीला नमवून आयपीएलचे जेतेपद पटकाविले होते.

यंदा वॉर्नर कमालीचा फॉमर्मध्ये आहे. मागच्यावर्षीच्या टी-२० विश्वचषकात त्याने धावांचा पाऊस पाडला. फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३८ चेंडूत ५३ धावा ठोकल्या होत्या. याच खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरले.   वॉर्नर स्वत: ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ बनला. वॉर्नरने  १५० आयपीएल सामन्यात ५४४९ धावा काढल्या आहेत. 

शुभमन गिल बनू शकतो केकेआरचा कर्णधार
आकाशच्या मते, केकेआरने शुभमन गिलसारख्या युवा खेळाडूला रिलिज करुन चूक केली. तथापि, त्याला लिलावाद्वारे रिटेन करायला हवे. असे झाल्यास कर्णधारपदाचा दुष्काळ त्याच्या रूपाने संपू शकतो. इयोन मोर्गन जखमी असल्याने आयपीएलमध्ये परतणार का, याविषयी शंका वाटते. केकेआर व्यवस्थापन श्रेयस अय्यरकडे कर्णधार या नात्याने जाळे टाकण्याच्या विचारात आहे. शहारुख खानने आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांना रिटेन केले. पण यापैकी कुणीही केकेआरचे नेतृत्व करण्यास क्षमतावान दिसत नाही. अशावेळी शुभमनला रिटेन करणे आणि या युवा खेळाडूच्या हातात नेतृत्वाचा भार सोपविणे केकेआरसाठी योग्य पर्याय ठरू शकेल. केकेआरने श्रेयसला स्वत:कडे घेतले तरी त्याला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीची संधी द्यावी, पण नेतृत्वाची संधी शुभमनकडे द्यायला हवी. शुभमन युवा असला तरी अनेक सामने खेळून तो आता परिपक्व झाला आहे.

Web Title: IPL 2022: So David Warner will not be able to be IPL captain, shocking reason given by Akash Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.