Join us

IPL 2022: धक्कादायक! 'दिल्ली कॅपिटल्स'चा सदस्य कोविड पॉझिटिव्ह; 'बायो-बबल'मध्ये कोरोनाची एन्ट्री

गेल्या हंगामात कोरोनामुळे लीग मध्येच थांबवण्यात आली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:58 IST

Open in App

IPL 2022 च्या हंगामात बायोबबलमध्ये कोरोनाचा प्रवेश झाला असून रिषभ पंत (Rishabh Pant) नेतृत्व करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे (DC) सदस्य फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आयपीएलने जारी केलेल्या मीडिया रिलीझमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक फरहार्ट यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

कोरोनाच्या उद्रेकाचा फटका आयपीएलच्या मागील हंगामावरही झाला होता. ४ मे २०२१ रोजी कोरोनामुळे आयपीएल हंगाम स्थगित करावा लागला होता. सनरायझर्स हैदराबादचा (SRH) विकेटकीपर फलंदाज वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती. IPL 2021 पुढे ढकलले जाईपर्यंत एकूण २९ लीग सामने झाले होते. नंतर BCCI ने उर्वरित सामने UAE मध्ये यशस्वीरित्या आयोजित केले. कोविडमुळे आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये २०२० सालीदेखील करण्यात आले होते. त्यावेळीही बायोबबलचे तंत्र वापरले होते.

क्रिकेटच्या खेळावर कोविडचा खूप परिणाम झाला. आता IPLच्या चालू हंगामातील ताज्या घडामोडींमुळे BCCIच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर, भारतीय संघात कोविड प्रकरणे वाढल्याने भारताने इंग्लंडचा दौरा मध्यातच सोडला होता. आता त्या दौऱ्यातील उर्वरित पाचवा कसोटी सामना जुलै २०२२ मध्ये खेळण्यात येणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्सरिषभ पंत
Open in App