Join us  

IPL 2022 Mumbai Indians : "इशान किशन प्रतिभावान खेळाडू, पण एकट्यावर १५.२५ कोटी खर्च करणं मोठी चूक"  

ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूचं वक्तव्य.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 6:00 PM

Open in App

IPL 2022 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लिलावादरम्यान इशान किशनवर (Ishan Kisan) १५.२५ कोटी रुपये खर्च करून मोठी चूक केली, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने (Shane Watson) व्यक्त केले. इशान किशान हा अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे, परंतु यामुळे टीमच्या एकंदरीत गुणवत्तेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं त्यानं म्हटलं.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) यांना कायम ठेवले आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या खेळाडूंच्या लिलावापूर्वी मुंबईने या चौघांना संघात ठेवले होते. पाच वेळचा चॅम्पियन ठरलेला मुंबईचा संघ इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये सलग पाच सामने हरला आहे. या हंगामात मुंबई हा एकमेव संघ असा आहे की ज्याने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही.

"या आयपीएलमधील मुंबईच्या संघर्षामुळे मला फारसे आश्चर्य वाटत नाही. लिलावादरम्यान त्यांनी अनेक चुका केल्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत अगदी तळाशी आहे हे पाहूनही मला आश्चर्य वाटले नाही," असं वॉटसन द ग्रेड क्रिकेटरशी बोलताना म्हणाला. "खेळाडूंचा लिलाव त्यांच्यासाठी खराब राहिला. त्यांनी इशान किशनवर अधिक पैसा खर्च केला. तो प्रतिभावान आणि उत्तम खेळाडू आहे. परंतु एकाच खेळाडूवर जवळपास आपली संपूर्ण रक्कम लावणं योग्य नाही. जोफ्रा आर्चरचं पुनरागमन होणार की नाही हे माहित नसतानाही त्याच्यावर बोली लावण्या आली. त्यानं बराच कालावधीपासून क्रिकेट खेळलेलं नाही. त्यांच्या संघात अनेक कमतरता दिसतायत," असंही त्यानं सांगितलं.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सइशान किशन
Open in App