IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RR vs RCB) हा सामना रंगणार आहे. राजस्थान आणि बंगळुरू यांच्या खात्यात प्रत्येकी १० गुण आहेत, परंतु संजू सॅमसनचा संघ एक सामना कमी खेळला आहे. मागील दोन सामन्यात गोल्डन डकवर बाद झालेल्या विराट कोहलीने ( Virat Kohli) आजच्या सामन्यात सलामीला येण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या पर्वात विराटला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने ८ सामन्यांत १७च्या सरासरीने ११९ धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात RCBने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगळुरूच्या संघात आज रजत पाटीदारला अनुज रावतच्या जागी खेळवण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्सकडून आज डॅरील मिचेल आणि कुलदीप सेन यांचे पुनरागमन झाले असून त्यांच्यासाठी करुण नायर व ओबेय मॅकॉय यांना बाहेर बसवले गेले आहे.
राजस्थान रॉयल्स - जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर, रियान पराग, डॅरील मिचेल, आर अश्विन , ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल ( RR: Jos Buttler, Devdutt Padikkal, Sanju Samson (capt, wk), Shimron Hetmyer, Riyan Parag, Daryll Mitchell, Ravichandran Ashwin,Trent Boult, Kuldeep Sen, Prasidh Krishna, Yuzvendra Chahal)