IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : रुसलेल्या नशिबाला सडेतोड उत्तर देण्यासाठी विराट कोहली ( Virat Kohli) याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज ओपनिंगला येण्याचा निर्णय केला. पण, ज्याच्या नावातच प्रसिद्ध 'कृष्णा' आहे त्याने विराटला आजही अपयशी ठरवले. आजचा सामना जेवढा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ( RCB) महत्त्वाचा आहे, तितकाच विराट कोहलीसाठी ( Virat Kohli) मागील दोन सामन्यांत विराट गोल्डन डकवर बाद झाला आहे. त्याने ८ सामन्यांत १७च्या सरासरीने ११९ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ( RR) सलामीला येण्याचा निर्णय घेतला, पण नशीब रुसलेच आहे.
मोहम्मद सिराज ( २-३०), जॉश हेजलवूड ( २-१९) व वनिंदू हसरंगा ( २-२३) यांनी राजस्थान रॉयल्सला सुरुवातीला धक्के दिले. पण, रियान परागने ( Riyan Parag) संयमी खेळी करताना अर्धशतकासह RRला समाधानकारक पल्ला गाठून दिला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला जोस बटलर ( ७) आज अपयशी ठरला. देवदत्त पडिक्कलने (८) अपयशाचा पाढा कायम राखला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या आर अश्विनने ( १७) चार चौकार खेचून चांगले संकेत दिले, परंतु मोहम्मद सिराजने त्याला माघारी पाठवला.
कर्णधार संजू सॅमसनकडून ( २७) अपेक्षा होत्या, परंतु वनिंदूने चतुराईने त्याला बाद केले. वनिंदूच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा संजूचा प्रयत्न फसला आणि वेगाने टाकलेल्या चेंडूने त्रिफळा उडवला. मिचेल ( १६) व रियान पराग यांनी ३१ धावांची भागीदारी केली. शिमरोन हेटमायर ( ३) पुन्हा फेल गेला. रियान परागने एकाकी झूंज देताना २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. परागने ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. राजस्थानने ८ बाद १४४ धावा केल्या. त्याने हर्षल पटेलने टाकलेल्या २०व्या षटकात १८ धावा चोपल्या.
पाहा व्हिडीओ...