Join us

IPL 2022 R Ashwin Daughter Dance Video: वडिलांनी सामना जिंकवताच अश्विनच्या लेकीचा भन्नाट डान्स, पत्नीचा आनंदही गगनात मावेना...

अश्विनने ठोकल्या २३ चेंडूत नाबाद ४० धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 15:31 IST

Open in App

R Ashwin Daughter Dance Video, IPL 2022: MS Dhoni च्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवला. CSK ने प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीच्या ९३ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाला १५० धावांपर्यंत मजल मारून दिली. यास प्रत्युत्तर देताना यशस्वी जैस्वालचे अर्धशतक आणि आर अश्विनची नाबाद ४० धावांची खेळी याच्या बळावर राजस्थानने विजय मिळवला. अश्विनने शेवटपर्यंत मैदान राखत संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याच्या मुलीने केलेला डान्स विशेष चर्चेत राहिला.

आर अश्विनला महत्त्वाच्या सामन्यासाठी बढती देऊन पाचव्या क्रमांकावर शिमरॉन हेटमायरच्या आधी पाठवण्यात आले. त्याने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. अश्विनच्या गोलंदाजीने प्रभाव पाडला होताच, पण त्यानंतर फलंदाजीतही त्याने चमक दाखवली. त्याने २३ चेंडूत ४० धावा केल्या. यात २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याने संघाला सामना जिंकवून दिल्यानंतर सारेच आनंदी झाले. त्याच्या मोठ्या लेकीने तर थेट नाचत आनंद साजरा केला. तसेच त्याची पत्नीही आनंदाने जल्लोष करताना दिसली. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास राजस्थानच्या संघासाठी शुक्रवारचा विजय हा टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे राजस्थानने चांगली गोलंदाजी केली. पण मोईन अलीच्या फटकेबाजीमुळे त्यांचा सहज विजय मिळवण्याचा प्लॅन फसला. १५१ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने अर्धशतक ठोकत ५९ धावा केल्या. मग तो बाद झाल्यानंतर अश्विनने संघाला विजय मिळवून देत टॉप-२ मधील स्थान पक्के केले.

टॅग्स :आयपीएल २०२२आर अश्विनराजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App