Join us  

बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना; दिल्लीला नमवल्यावर मुंबईपेक्षा Virat Kohli अन् RCB नं केलं भारी सेलिब्रेशन, Video

आयपीएल २०२२ च्या शनिवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात झालेल्या या पराभवानं दिल्लीच्या टॉप ४ मध्ये जाण्याच्या आशा मावळल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 3:50 PM

Open in App

आयपीएल २०२२ च्या शनिवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात दिल्लीच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानं दिल्लीच्या टॉप ४ मध्ये जाण्याच्या आशा मावळल्या. तर दुसरीकडे मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला मात्र टॉप ४ मध्ये एन्ट्री मिळाली. मुंबई इंडियन्सच्या पराभवनानंतर रॉलय चॅलेंजर्स बंगळुरूच्या प्लेअर्सचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या विजयानंतर विराट कोहली आणि अन्य खेळाडू आनंदानं नाचताना दिसले.

या मॅचदरम्यान बंगळुरूचे प्लेअर्स मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसले. इतकंच नाही, तर मॅचदरम्यानही ग्राऊंडवर प्रेक्षक बंगळुरूच्या टीमला सपोर्ट करताना दिसत होते. या सामन्यात जसप्रित बुमराह आणि टीम डेव्हिड यांनी उत्तम कामगिरी केली आणि मुंबई इंडियन्सचा संघही विजयी झाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यानं टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. बुमराहनं चार ओव्हर्समध्ये २५ धावा देत ३ गडी बाद केले. तर रमणदीप सिंगनं दोन ओव्हर्समध्ये २९ धावा करत दोन गडी बाद केले.मुंबईकडून फलंदाजी करताना इशान किशननं ४८ धावा केल्या. तर ब्रेविसनं ३७ धावा करत मोलाचा वाटा उचलला. टीम डेव्हिडनं जबरदस्त फलंदाजी करत ११ चेंडूमध्ये ३४ धावा करत मुंबईला विजयाच्या दिशेनं नेलं. डेव्हिडनं आपल्या या खेळात २ चौकार आणि ४ षटकार लगावले.

टॅग्स :मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२२
Open in App