Rishabh Pant 'या' स्टार क्रिकेटरला देईना IPL मध्ये संधी, बेंचवर बसून करिअरची लागतेय वाट!

या क्रिकेटरने आयपीएल 2021 मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते. त्याने आरसीबीला स्वतःच्या बळावर अनेक सामने जिंकून दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 05:37 PM2022-04-27T17:37:02+5:302022-04-27T17:48:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Rishabh Pant not give chance to delhi capitals star batsman ks bharat in playing 11  | Rishabh Pant 'या' स्टार क्रिकेटरला देईना IPL मध्ये संधी, बेंचवर बसून करिअरची लागतेय वाट!

Rishabh Pant 'या' स्टार क्रिकेटरला देईना IPL मध्ये संधी, बेंचवर बसून करिअरची लागतेय वाट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल 2022 मध्ये, प्रेक्षकांना सातत्याने रोमांचक सामने बघायला मिळत आहेत. आयपीएलच्या माध्यमातून अनेक क्रिकेटपटूंनी आपले करिअर घडवले आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) एका खेळाडूला अद्यापही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. ऋषभ पंत (Rishabh Pant) या खेळाडूला एकही संधी देत नाहीये.

या खेळाडूला मिळेना संधी -  
आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब आहे. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 7 पैकी 4 सामने गमावले आहेत. मात्र, असे असतानाही ऋषभ पंतने स्टार यष्टीरक्षक केएस भरतला (KS Bharat) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली नाही. भरत उत्कृष्ट फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे कोणत्याही खेळपट्टीवर धावा करण्याची क्षमता आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

आयपीएल 2021 मध्ये दिसला होता दम -  
केएस भरतने आयपीएल 2021 मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते. त्याने आरसीबीला स्वतःच्या बळावर अनेक सामने जिंकून दिले होते. तो जेव्हा लयीत असतो, तेव्हा कुठल्याही गोलंदाजाला सहजपणे फोडू शकतो. त्याने आयपीएल 2021 मध्ये 8 सामने खेळत 191 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध रिद्धिमान साहा जखमी झाल्यानंतर, भरतने उत्कृष्ट यष्टिरक्षण केले होते. एवढेच नाही, तर गेल्या मोसमात त्याने स्वबळावरच आरसीबीला प्लेऑफमध्येही पोहोचवले होते.

Web Title: IPL 2022 Rishabh Pant not give chance to delhi capitals star batsman ks bharat in playing 11 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.