IPL 2022 Retention Live Updates : राशिद खानसोबत बोली फिसकटली, सनरायझर्स हैदराबादनं केन विलियम्सनसह तीन खेळाडूंना राखले कायम

Indian Premier League 2022 Retention Live Updates :  इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी होणाऱ्या Mega Auction मध्ये मोठमोठ्या खेळाडूंवर बोली लागताना पाहायला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 10:04 PM2021-11-30T22:04:46+5:302021-11-30T22:05:11+5:30

IPL 2022 Retention Live Updates : Sunrisers Hyderabad retained Kane Williamson - 14 cr, Umran Malik - 4 cr & Abdul Samad - 4 cr  | IPL 2022 Retention Live Updates : राशिद खानसोबत बोली फिसकटली, सनरायझर्स हैदराबादनं केन विलियम्सनसह तीन खेळाडूंना राखले कायम

IPL 2022 Retention Live Updates : राशिद खानसोबत बोली फिसकटली, सनरायझर्स हैदराबादनं केन विलियम्सनसह तीन खेळाडूंना राखले कायम

Next

Indian Premier League 2022 Retention Live Updates :  इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी होणाऱ्या Mega Auction मध्ये मोठमोठ्या खेळाडूंवर बोली लागताना पाहायला मिळणार आहे. डेव्हिड वॉर्नरला ( David Warner) IPL 2022त संघात कायम न राखणार असल्याचे संकेत सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) दिले होते. त्यामुळे आजच्या खेळाडू रिटेन करणाऱ्या अखेरच्या दिवशी त्याचं नाव टॉप फोअरमधून गायब असेल, ही खात्री सर्वांनाच होती. पण, वॉर्नरसह  SRHनं जॉन बेअरस्टो ( Jonny Bairstow)  यालाही रिलिज केल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हैदराबादनं एक परदेशी व दोन भारतीय खेळाडूंना कायम राखले आहे. 

वॉर्नर व बेअरस्टो जोडीनं २४ डावांत ५८.३७ च्या सरासरीनं १४०१ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ अर्धशतकी व ५ शतकी भागीदारी आहेत. त्यांनी १८५ धावांची ही सर्वाधिक भागीदारी केली आहे.  वॉर्नरनं २०१६मध्ये हैदराबादला आयपीएल जेतेपद पटकावून दिले होते आणि तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकली होती. आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली ( ९७३ धावा) याच्यानंतर वॉर्नरचा ( ८४८ धावा) क्रमांक येतो. हैदराबादनं अव्वल फिरकीपटू राशिद खान यालाही रिलीज केल्याची चर्चा आहे. राशिदला रिटेन करण्यात येणाऱ्या चार खेळाडूंमध्ये अव्वल स्थान हवे होते. परंतु फ्रँचायझी व त्याच्यात सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही.  


जाणून घ्या टीमनिहाय यादी
  • चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली
  • कोलकाता नाइट रायडर्स - सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर
  • सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( 14 कोटी), अब्दुल समद ( 4 कोटी), उम्रान मलिक ( 4 कोटी) 
  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( 16 कोटी), जसप्रीत बुमराह ( 14 कोटी), किरॉन पोलार्ड ( 6 कोटी), सूर्यकुमार यादव ( 8 कोटी)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी); 57 कोटी शिल्लक
  • दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, अॅनरीच नॉर्ट्झे,
  • राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल
  • पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( 14 कोटी), अर्षदीप सिंग ( 4 कोटी)  

Web Title: IPL 2022 Retention Live Updates : Sunrisers Hyderabad retained Kane Williamson - 14 cr, Umran Malik - 4 cr & Abdul Samad - 4 cr 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app