IPL 2022 Retention Live Updates : मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला वाट मोकळी करून दिली; जाणून घ्या सूर्यकुमार यादव व इशान किशन यांच्यापैकी कोणाची निवड केली

IPL 2022 Retention Live Updates : आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) कोणत्या चार खेळाडूंना कायम राखते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 09:44 PM2021-11-30T21:44:16+5:302021-11-30T21:45:18+5:30

IPL 2022 Retention Live Updates : Rohit Sharma, Surya, Bumrah and Pollard retained by five times champions MI, says owner Akash Ambani | IPL 2022 Retention Live Updates : मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला वाट मोकळी करून दिली; जाणून घ्या सूर्यकुमार यादव व इशान किशन यांच्यापैकी कोणाची निवड केली

IPL 2022 Retention Live Updates : मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला वाट मोकळी करून दिली; जाणून घ्या सूर्यकुमार यादव व इशान किशन यांच्यापैकी कोणाची निवड केली

Next

IPL 2022 Retention Live Updates : आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) कोणत्या चार खेळाडूंना कायम राखते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. कर्णधार रोहित शर्मा व प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ही दोन नावं पक्की होती. पण, उर्वरित दोन जागांसाठी बराच विचार फ्रँचायझीला करावा लागला. मुंबई इंडियन्सनं २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० मध्ये जेतेपद पटकावले आणि त्यांच्या या यशात संघातील प्रत्येक खेळाडूनं महत्त्वाचा वाटा उचलला. त्यामुळे यापैकी फक्त चार खेळाडू निवडताना संघालाही फार जड गेले. रिलिज केलेल्या खेळाडूंमध्ये सर्वात मोठे नाव ठरले ते हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याचे.

मुंबई इंडियन्सनं रोहित, जसप्रीत यांच्यासह किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याला रिटेन केलं आहे. त्यांनी मागील लिलावात पोलार्डला रिलिज केलं होतं, परंतु राईट टू मॅच  ( RTM) कार्डचा वापर करून त्यांनी कमी किमतीत पोलार्डला पुन्हा आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. पण, यावेळी RTM नसल्यानं मुंबईला कोणताच धोका पत्करायचा नव्हता आणि म्हणून त्यांनी रोहित व जसप्रीतसह  पोलार्डला संघात कायम राखले. इशान किशन व सूर्यकुमार यांच्यामध्ये टॉस होता आणि मुंबई इंडियन्सनं चौथा खेळाडू म्हणून सूर्यकुमारला कायम राखले.

मुंबई इंडियन्सनं रोहितला  16, जसप्रीतला  12, सूर्यकुमारला 8 व पोलार्डला 6 कोटींत कायम ऱाखून  पर्समधून 48 कोटी वाचवले आहे. 

Web Title: IPL 2022 Retention Live Updates : Rohit Sharma, Surya, Bumrah and Pollard retained by five times champions MI, says owner Akash Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app