Join us

IPL 2022 RCB vs SRH Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस (५), विराट कोहली (०), अनुज रावत (०), ग्लेन मॅक्सवेल (१२); रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संकटात, २६ चेंडूंतच लागली वाट! Video 

IPL 2022 ROYAL CHALLENGERS BANGALORE vs SUNRISERS HYDERABAD Live Updates : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) मागे कोणती पनवती लागलीय?; हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावतोय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 20:15 IST

Open in App

IPL 2022 ROYAL CHALLENGERS BANGALORE vs SUNRISERS HYDERABAD Live Updates : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) मागे कोणती पनवती लागलीय?; हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावतोय... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७१व्या शतकाची प्रतीक्षा मागील दोन-अडीच वर्षांपासून त्याचे चाहते पाहत आहेत. त्यात कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर पुर्वीचा विराट पुन्हा पाहायला मिळेल, अशी आशाही फोल ठरतेय. इंडियन प्रीमिअर लीग २०२२त तर त्याची बॅट आणखी थंडावलीय. सलग दोन सामन्यांत तो नुसता भोपळ्यावर नाही, तर Golden Duck वर माघारी परतला आहे. सनरायझर्स हैदराबाद ( SRH) विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ( RCB) अवस्था आणखी बेक्कार झाली आहे.

मार्को येनसनने दुसऱ्याच षटकात RCBचे ढाबे दणाणून सोडले. त्याने दुसऱ्या चेंडूवर RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचा ( ५) त्रिफळा उडवला, त्यानंतर विराटला (०) दुसऱ्या स्लिपमध्ये कॅच देण्यास भाग पाडले. या विकेटनंतर स्टेडियमवर शांतता पसरली. विराटही डोकं खाली करून नशीबावर हसला.. त्याच षटकाच्या ६व्या चेंडूवर अनुज रावत ( ०) माघारी परतला. ग्लेन मॅक्सवेल आला आणि फटकेबाजी केली, परंतु टी नटराजनने पाचव्या षटकात त्याची विकेट घेतली. २६ चेंडूंत RCBचे चार स्टार फलंदाज २० धावांवर माघारी परतले.

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीसनरायझर्स हैदराबादएफ ड्यु प्लेसीस
Open in App