IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी धडपणाऱ्या पंजाब किंग्सने आज धडाकेबाज सुरूवात केली. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) नेमकं आज काय खाऊन आलेला तेच कळेनासे झाले. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) गोंलंदाजांना चांगलेच चोपून काढले. शिखर धवननेही हात साफ केले. पंजाबचे सलामीवीर आज फुल चार्ज होऊनच मैदानावर उतरले होते. त्यात बेअरस्टोची फटकेबाजी RCBची डोकेदुखी वाढवणारी ठरली. ( पाहा IPL 2022 - RCB vs PBKS सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
बेअरस्टो आज भलत्याच फॉर्मात होता.... उभ्या उभ्या षटकार मारणे, काय असतं हे त्याने आज जोश हेझलवूडला दाखवून दिले. बेअरस्टोने दुसऱ्या षटकात २२ धावा कुटल्या. बेअरस्टो व धवन यांनी ३.५ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. RCB च्या प्रमुख गोलंदाजांन जिथे अपयश आले, तिथे ग्लेन मॅक्सवेलने कमाल केली. ५व्या षटकात त्याने ही PBKSला पहिला धक्का दिला. धवनला ( २१) मॅक्सवेलने त्रिफळाचीत करून ६० धावांवर पंजाबला धक्का दिला. बेअरस्टोची फटकेबाजी काही थांबली नाही. त्याने मोहम्मद सिराजच्या पुढच्याच षटकात चार खणखणीत षटकात खेचले आणि २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत ७ षटकार व ३ चौकारांचा समावेश होता. पंजाबने पहिल्या सहा षटकांत १ बाद ८३ धावा कुटल्या.
पंजाब किंग्सची ही पॉवर प्लेमधील दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१४मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांनी १ बाग ८६ धावा केल्या होत्या. २०११मधील राजस्थान रॉयल्सविरुद्धचा (१ बाद ७७) विक्रम आज मोडला गेला. भानुका राजपक्षा ( १) याला वनिंदू हसरंगाने स्वस्तात माघारी पाठवल्यानंतरही बेअरस्टोची फटकेबाजी थांबली नाही. त्याला नशिबानेही साथ दिली. दिनेश कार्तिककडून स्टम्पिंगच्या संधी सुटल्या. अखेर १०व्या षटकात बेअरस्टोचे वादळ रोखण्यात RCBला यश आले. शाहबाज अहमदने ही महत्त्वाची विकेट घेतली. बेअरस्टो २९ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. पॉवर प्लेमध्ये ७ षटकार खेचणारा बेअरस्टो दुसरा फलंदाज ठरला. याआधी सनथ जयसुर्याने २००८मध्ये CSK विरुद्ध हा पराक्रम केला होता. Players to hit 7 6s in an IPL Powerplay