Join us  

Glenn Maxwell IPL 2022 RCB vs GT Live Updates : ग्लेन मॅक्सवेलची हनुमान उडी; अफलातून कॅच घेत गुजरात टायटन्सला दिला धक्का, Video 

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : १३ सामन्यांत १० विजय मिळवून २० गुणांसह गुजरातने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. पण, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी RCB ला आज विजय मिळवणे, हाच एक पर्याय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 8:15 PM

Open in App

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ चा  ६७ वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) व टेबल टॉपर गुजरात टायटन्स (  Gujarat Titans ) यांच्यात सुरू आहे. १३ सामन्यांत १० विजय मिळवून २० गुणांसह गुजरातने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. पण, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी RCB ला आज विजय मिळवणे, हाच एक पर्याय आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला... रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर करो वा मरो परिस्थिती आहे, त्यांनी मोहम्मद सिराजच्या जागी सिद्धार्थ कौलला संधी दिली. गुजरातने अल्झारी जोसेफच्या जागी ल्युकी फर्ग्युसनला खेळवले आहे. ( पाहा IPL 2022 - RCB vs GT सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस, रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल, जोश हेझलवूड ( RCB XI: Virat Kohli, Faf du Plessis(c), Rajat Patidar, Glenn Maxwell, Mahipal Lomror, Dinesh Karthik(w), Shahbaz Ahmed, Wanindu Hasaranga, Harshal Patel, Siddarth Kaul, Josh Hazlewood)

गुजरात टायटन्स - वृद्धीमान सहा, शुबमन गिल, मॅथ्यू वेड,  हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, रवीश्रीनिवासन साई किशोर, ल्युकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी ( Gujarat Titans XI: Wriddhiman Saha(w), Shubman Gill, Matthew Wade, Hardik Pandya(c), David Miller, Rahul Tewatia, Rashid Khan, Ravisrinivasan Sai Kishore, Lockie Ferguson, Yash Dayal, Mohammed Shami) 

फॉर्मात असलेल्या वृद्धीमान साहाने  चौकार-षटकार खेचून मनसुबे स्पष्ट केले. पण, तिसऱ्या षटकात जोश हेझलवूडने गुजरात टायटन्सला जमिनिवर आणले. हेझलवूडने टाकलेला अप्रतिम चेंडू शुबमन गिलच्या बॅटची किनार घेत दुसऱ्या स्लिपच्या दिशेने गेला. ग्लेन मॅक्सवेलने तितक्याच चपळाईने हनुमान उडी मारून एका हाताने चेंडू टिपला. त्याचा हा अफलातून कॅच पाहून विराट कोहलीही अवाक् झाला. त्यानंतर आलेला मॅथ्यू वेड ( १६) याला ग्लेन मॅक्सवेलने पायचीत केले. GT ची अवस्था २  बाद ३८ अशी झाली होती. 

 

टॅग्स :आयपीएल २०२२ग्लेन मॅक्सवेलगुजरात टायटन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशुभमन गिल
Open in App